Friday, December 13, 2024
Home ताज्या जनकल्याणासाठी मी आणि संजयबाबा उर्वरीत आयुष्य खर्ची घालू - आमदार हसनसाहेब मुश्रीफ...

जनकल्याणासाठी मी आणि संजयबाबा उर्वरीत आयुष्य खर्ची घालू – आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे प्रतिपादन

जनकल्याणासाठी मी आणि संजयबाबा उर्वरीत आयुष्य खर्ची घालू – आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे प्रतिपादन

व्हनाळी येथे भव्य शेतकरी व युवक मेळावा उत्साहात

व्हनाळी/प्रतिनिधी : मी आणि संजयबाबा कॅालेजपासूनचे जीवाभावाचे मित्र आहोत. एकाच क्रिकेट संघात आम्ही खेळलेले खेळाडू आहोत. दोघेही गेली 30-35 वर्षे संघर्ष करीत राहिलो. यापुढे आम्ही दोघेही उर्वरीत आयुष्य जनकल्याणासाठी खर्ची घालणार आहोत, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले.व्हनाळी ता. कागल येथील आयोजित भव्य शेतकरी व युवक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.                                             आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, संजयबाबा घाटगे यांनी प्रामाणिकपणे काम करून जीवाभावाची माणसे जपली. कोणत्याही फारमोठ्या राजकिय सत्ता नसतानाही कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठाम राहिलेत हे त्यांचे फार मोठे काम आहे. दोघांनीही शेतकरी केंद्रबिंदू मानून आजपर्यंत काम केले आहे. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता तसेच गोरगरीब यांच्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला आहे. येणा-या काळात शेतकरी, सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी व संययबाबा आमच्या राहिलेल्या उर्वरीत आयुष्यामध्ये त्यांची सेवा करीत राहू, असा ठाम विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.संजयबाबा घाटगे म्हणाले, मी व हसन मुश्रीफ कॅालेज जीवनात सहा वर्षे एकमेकांचे मित्र असून एकत्र क्रिकेट खेळलो आहोत. त्यामुळे मी मुश्रीफांना जवळून ओळखतो. मधल्या काळात राजकिय घडामो़डीमुळे आमच्यात फारकत आली असली तरी आम्ही एकमेकांचे शत्रू कधीच नव्हतो आणि नाही. त्यामुळे नेहमीच तालुक्याच्य़ा विकासाच्या मुद्यावर आम्ही एकसंघपणे काम करणार आहोत. अन्नपुर्णा शुगरच्या उभारणीत मुश्रीफांचे मोठे योगदान असल्याचे गौरवउदगार माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी काढले.अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, अन्नपुर्णा पाणी योजनेमुळेच पंचक्रोशीत गतवैभव प्राप्त झाले आहे. विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम करत असताना मुश्रीफ साहेबांनी विकासाच्या अनेक योजना वाडीवस्तीपर्यंत पोहचवून तालुक्याचा कायापालट केला आहे. त्यामुळे विकास कामात त्यांचे फारमोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

“हा कसला पुरुषार्थ?”
जिल्हा परिषद सदस्य अमरीशसिंह घाटगे म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी गट -तट, पक्ष -पार्टी न बघता विकासकामांच्या माध्यमातून गावेच्या गावे समृद्ध केली. परंतु; काहीजण मंजूर झालेली कामे रोखण्यातच धन्यता मानत आहेत. मंजूर निधी रोखणे हा कसला पुरुषार्थ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक भैया माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील, प्रविणसिंह पाटील, धनराज घाटगे, प्रविणसिहं भोसले, के. बी. वाडकर यांनी मनोगत व्यक्त केली.व्यासपीठावर दत्तोपंत वालावलकर, के. के. पाटील, बाळासाहेब तुरंबे, दत्ता पाटील, महेश देशपांडे, धनाजी गोधडे, ए. वाय. पाटील, सुर्यकांत पाटील, रणजित मुडूकशिवाले, प्रकाश वाडकर, सुरेश पाटील, विश्वास पाटील, सुरेश मर्दाने, उत्तम वाडकर, पप्पू पोवार आदी प्रमुख उपस्थीत होते.स्वागत योगेश कुळवमोडे यांनी केले. सुत्रसंचलन रमेश जाधव तर आभार नामदेव गुरव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती...

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

Recent Comments