रमाई आवास योजनेच्या ५५ घरकुलधारकांना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटप
आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रयत्नानेच जुनी, पडकी -सडकी कौलारू घरे जाऊन पक्की घरे मिळाल्याची भावना
कागल/प्रतिनिधी : येथील रमाई आवास योजनेच्या ५५ घरकुलधारकांना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते मंजूरीपत्रांचे वाटप झाले. त्याबद्दल आमदार श्री. मुश्रीफ यांचा घरकुलधारकांच्यावतीने कृतज्ञतापर सत्कार झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, महात्मा फुले वसाहत, दावने वसाहत, श्री. गहिनीनाथ नगर, संत रोहिदास चौक, माळभाग वड्डवाडी, श्री. शाहूनगर बेघर वसाहत, मातंग वसाहत, राजीव गांधी वसाहत येथील रहिवाशांचा यामध्ये समावेश आहे. आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रयत्नानेच जुनी, पडकी -सडकी, कौलारू घरे जाऊन पक्की घरे मिळाल्याची भावना या रहिवाशांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, अठरापगड जातीचा बहुजन समाज माझे कुटुंब बनला आहे. त्यांच्या कल्याणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठीच संपूर्ण आयुष्य खर्ची घालणार आहे.
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी गेली वीस वर्षे रमाई आवास योजना शहरात राबविली आहे. त्यामुळेच झोपडपट्ट्या, पडकी, कौलारू जीर्ण झालेली घरे जाऊन आज हजारो कुटुंबे आरसीसी घरात राहत आहोत. एखाद्या उच्चभ्रू नागरिकांच्या वसाहतीला लाजवेल, असे त्यांचे राहणीमान झाले आहे. याचे श्रेय कोणी ऐरा- गैरा घेत असेल तर हे चालू देणार नाही.माजी नगराध्यक्ष अजित कांबळे म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनीच गोरगरिबांचा उद्धार केला आहे. त्यामुळेच आमची पडकी -सडकी घरे जाऊन मजबूत घरे आम्हाला मिळालेली आहेत. कोणीतरी मी केलं, मी केलं असं थातूरमातूर सांगत असेल तर हे चालणार नाही. आमदार श्री. मुश्रीफसाहेब हेच गरिबांचा आधार आहेत आणि त्यांचा आधार आम्हाला सदैव लाभावा एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, नगरसेवक प्रवीण काळबर, नगरसेवक विवेक लोटे, भगवान कांबळे, सुरेश कांबळे, गणेश कांबळे, दीपक कांबळे, सुरज कामत, बच्चन कांबळे, तुषार भास्कर, दीपक कांबळे, राहुल कांबळे, सागर दावने आदी प्रमुख उपस्थित होते.
“घरकुलांचे मंजुरीपत्र मिळालेल्या लाभार्थ्यांची नावे अशी”
संजय सिताराम कांबळे, लता उत्तम कांबळे, लैला मारुती दावणे, सविता शाहु आयवाळे, सतिश शिवाजी कांबळे, अमोल दगडु सोनुले, दिलीप शामराव सोनुले, रविंद्र प्रकाश गाडेकर, संगिता सुभाष सोनुले, छाया रजणीकांत मेस्त्री, यशोधा धोंडीराम कांबळे, शशिकला परसु कांबळे, गीता अरविंद कांबळे, सुप्रिया सचिन कांबळे, सुरज समशौन विभुते, अमित मारुती कांबळे, बाळु विष्णु सोनुले, रोशन सुनिल कांबळे, नितेश चंद्रकांत कांबळे, दिलीप दिनकर गाडेकर, राजु वसंत गाडेकर, बाळासो सखाराम कांबळे, रोहीत श्रीकांत कांबळे, राहुल श्रीकांत कांबळे, संजय शंकर सोनुले, इंदुबाई दत्तु साठे, आनंदा दत्तु साठे, आकाश विजय कांबळे, रंजना साताप्पा कांबळे, अमित आदम कांबळे, प्रविण आदम कांबळे, अजय अनिल कांबळे, प्रिया प्रताप कांबळे, कृष्णात यादव कांबळे, उमेश लक्ष्मण कांबळे, अजित श्रीपती कांबळे, अमित प्रभाकर कांबळे, शांताबाई संभाजी यादव, भारती गणपती कांबळे, निलेश विश्वास जाधव, कुशाल अशोक कानडे, मयुरी दिलीप कांबळे, विक्रम चंदर गाडेकर, सतिश उत्तम कांबळे, मारुती सिताराम कांबळे, कमल राजेंद्र दावणे, आदित्य भालचंद्र भोसले, वैभव दिनकर हेगडे, रोहिणी अरुण दावणे, सौरभ बाळू सोनुले, उमेश भिमराव कांबळे, विशाल शिवाजी दावणे, शालन कृष्णात दावने.