निवासिनी आई अंबाबाई ची सहाव्या दिवशी करवीर काशी ‘विश्वेश्वरांना दर्शन’ स्वरूपात पूजा
कोल्हापूर/प्रतिनिधी : अश्विन शुद्ध षष्ठीला आज सहाव्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी आई अंबाबा ईची शारदीय नवरात्रौत्सवाचा सहावा दिवस. आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई ची करवीर काशी ‘विश्वेश्वरांना दर्शन’ स्वरूपात पूजा अलंकार पूजा साकारली आहे. ती भगवान शंकर काशी सोडून करवीरात निवासाला आले तो प्रसंग सांगणारी . विश्वाच्या निर्मिती नंतर भगवान विष्णूंनी दोन क्षेत्रांची निर्मिती केली एक उत्तरेला काशी दुसरं दक्षिणेला करवीर. उत्तरेची काशी ही मुक्तीदायक ज्ञानपीठ तिचं स्वामित्व भगवान विश्वेश्वराचं तर दक्षिणेचं करवीर म्हणजे मुक्ती बरोबरच भुक्ती म्हणजे आयुष्याची सर्व सुखं देणारं महामातृक अर्थात आईचं मोठं शक्तीपीठ. जेव्हा विष्णूंनी या दोन क्षेत्रांची तुलना केली तेव्हा मुक्तीबरोबर भुक्ती देणारं हे क्षेत्र केवळ एका जवाच्या वजनानं श्रेष्ठ ठरलं म्हणून ही जवा आगळी काशी हा महिमा जाणून भगवान विश्वेश्वर आपल्या सर्व परिवारासह करवीरात आले त्यांनी जगदंबेचं दर्शन घेतले आणि त्या प्रसंगी मातेने त्यांना सांगितले की आपण माझ्या उजव्या बाजूला राहून सर्व भक्तांना तारक मंत्र द्या. त्याप्रमाणे आजही भगवान विश्वेश्वर माता अन्नपूर्णा धुंडीराज गणपती आणि काशी कुंडातील गंगेसह घाटी दरवाजा जवळ असलेल्या मंदिरात राहून भक्तांना मुक्ती देतात.असा या पूजेचा अर्थ आहे.