Tuesday, October 8, 2024
Home ताज्या विश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व गोंधळी युवा स्टेट अवॉर्ड २०२० या पुरस्काराने सन्मानित

विश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व गोंधळी युवा स्टेट अवॉर्ड २०२० या पुरस्काराने सन्मानित

विश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व गोंधळी युवा स्टेट अवॉर्ड २०२० या पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर/प्रतिनिधी : विश्वविक्रमवीर डाॅ. अथर्व संदीप गोंधळी वय चौदा वर्षे   यास  बहूजनरत्न रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे वतीने देण्यात येणारा युवा स्टेट अवॉर्ड २०२० या पुरस्काराने प्रसाद संकपाळ,प्रा. गिरी,  निरंजन तिवारी, महेश शिर्के अनिल माळवी, पीआय विजय साळूंखे डीवायएसपी स्वाती गायकवाड साळूंखे या सर्वांच्या उपस्थितीत सन्मानित  करण्यात आले.यावेळी अथर्वची आई डॉ.सौ.मनीषा संदीप गोंधळी यांनाही आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
टोप संभापुर ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील विश्वविक्रमवीर डॉ.अथर्वने वयाच्या १४ व्या वर्षी ३० नोव्हेंबर २०१९ रोजी बारा तासात २९६ किलोमीटर अंतर सायकलिंग मध्ये पूर्ण करून कोल्हापूरमध्ये विश्वविक्रम केला होता.
डॉ अथर्व हा लहानपणापासून विविध खेळांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय यश मिळवत आला आहे.२०१९ मध्ये तायक्वांनदो,कुडो,सायकलिंग, ट्रायलिथॉन अशा विविध खेळांमध्ये त्यांने पारितोषिके पटकावली आहेत.सध्याही तो विविध खेळांमध्ये अग्रेसर आहे.सायकलिंगमध्ये त्याने केलेल्या विश्वविक्रमाची नोंद ही
ग्लोबल रेकॉर्ड, चिर्ल्डन वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड,एशिया पॅसिफिक रेकॉर्ड आणि नॅशनल रेकॉर्ड असे एकूण ११ विक्रमांमध्ये झाली आहे.याचीच दखल ही
द डायसेस ऑफ एशिया इन इंडिया चेन्नई तामिळनाडू यांनी घेऊन त्याला डॉकटरेट इन एथलेटिक ही पदवी बहाल केली होती.
शिवाय केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय रामदासजी आठवले यांच्या २५ डिसेंबर या वाढदिवसाचे औचित्य साधून कराड येथे संघर्ष दिन साजरा करण्यात आला होता यावेळी बहुजन रत्न रामदास आठवले प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संघर्षमय कर्तुत्वाने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खेळाडूंना बेस्ट २०१९ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यामध्येही विश्वविक्रमवीर डॉ अथर्व गोंधळी याला बेस्ट अँथलेट ऑफ द इयर २०१९ या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
डॉ.अथर्वला होली मदर स्कूलच्या प्रिन्सिपल सौ.अनुराधा पाटील,शीतल पाटील,कोरगावकर ट्रस्टचे अमोल कोरगावकर,आकाश कोरगावकर, वडील डॉ.संदीप गोंधळी,आई डॉ.सौ.मनीषा गोंधळी,अनिल माळवी,पत्रकार श्रद्धा जोगळेकर यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री...

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्तुर येथील...

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा   कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी...

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा...

Recent Comments