Friday, September 13, 2024
Home ताज्या लम्पी स्किन आजारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण तात्काळ पूर्ण करा - श्री.राजेश...

लम्पी स्किन आजारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण तात्काळ पूर्ण करा – श्री.राजेश क्षीरसागर

लम्पी स्किन आजारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे लसीकरण तात्काळ पूर्ण करा – श्री.राजेश क्षीरसागर

लम्पी स्किन आजारासंदर्भातील आढावा बैठकीत पशुसंवर्धन उप-आयुक्तांना सूचना

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यात जनावरांमध्ये वेगाने पसरत चाललेल्या लम्पी स्किन आजारासंदर्भात प्रशासनाने कोणकोणत्या उपाययोजना केल्या. या रोगाबाबत पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या आजारावर मात करण्यासाठी तात्काळ जिल्हातील सर्व गाईंचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी पशुसंवर्धन उप-आयुक्त डॉ.पठाण यांना दिल्या. लम्पी स्किन आजारासंदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पशुसंवर्धन अधिकारी आणि कोल्हापूर जिल्हा म्हैसधारक व दुधविक्रेते असोसिएशनची आढावा बैठक पार पडली.बैठकीच्या सुरवातील श्री.राजेश क्षीरसागर यांनी, या आजाराने बाधित झालेल्या गाईंची संख्या, त्यातून बरी झालेली जनावरे आणि सध्या उपचार सुरु असणारी जनावरांची माहिती घेतली. यासह या आजाराची लक्षणे गाई व्यतिरिक्त अन्य पाळीव प्राण्यामध्ये दिसून आली आहेत का? अन्य प्राणी बाधित झाले आहेत का? याचा आढावा घेतला.
याबाबत माहिती देताना पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ.पठाण यांनी, जिल्ह्यात सध्या ६२ गाई या आजाराने ग्रस्त झाल्या होत्या. त्यातील २२ गाई बऱ्या झाल्या असून उर्वरित ४० गाईवर उपचार सुरु असल्याचे सांगितले. सदर गाईना स्वतंत्र विलगीकरणकरून ठेवण्यात आले आहे. या आजाराच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात एकही जनावराचा मृत्यु झाला नसल्याचे सांगितले. यासह हा आजार फक्त गाईमध्ये पसरला असून, यापासून अन्य कोणतेही जनावर बाधित झालेले नसल्याचे सांगितले. यासह शासकीय मदतीसाठी टोल फ्री नंबर १९६२ व १८००२३३०४१८ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.
यावर बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, या रोगावरील उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्याला रु.१ कोटींचा निधी शासनाने दिला असून, त्यातून आवश्यक जनावरांची औषधे, गोठ्यात फवारणीसाठीची औषधे मोफत पशुपालकांना पुरविण्यात यावीत. या आजारासंदर्भात पशुपालकांना योग्य ते मार्गदर्शन करावे. जिल्ह्यातील १२ तालुक्यात तात्काळ लसीकरणाची मोहीम राबवावी. १००% लसीकरण होणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, लसीकरणाचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याच्या सूचना दिल्या. यासह पशुपालकांसह सामान्य नागरिकामध्येही या आजाराबाबत संभ्रमावस्था असून, अन्य कोणत्याही प्राण्यामध्ये याचा प्रादुर्भाव होत नसल्याचे प्रशासन स्तरावर जाहीर करावे. गाई वगळता इतर दुभत्या जनावरे व दुध विक्रेत्यांवर निर्बंध लादू नयेत, अशा सूचनाही यावेळी दिल्या.यावेळी पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त वडगावे, कोल्हापूर जिल्हा म्हैसधारक व दुधविक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, बाळासाहेब चिले, राजेंद्र पाटील, युवराज बचाटे, बाबुराव मोहिते, गोगा पसारे, नंदू गवळी, प्रताप आडगुळे, सदानंद गवळी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

चाटे शिक्षण समुहाच्या कोल्हापूर विभागातील ३१ विद्यार्थ्यांना मेडिकल आणि ३२७ विद्यार्थ्यांना इंजिनिअरींगच्या विविध शाखांमध्ये प्रवेश

चाटे शिक्षण समुहाच्या कोल्हापूर विभागातील ३१ विद्यार्थ्यांना मेडिकल आणि ३२७ विद्यार्थ्यांना इंजिनिअरींगच्या विविध शाखांमध्ये प्रवेश कोल्हापूर/प्रतिनिधी : देश व राज्य पातळीवरील विविध वैद्यकिय आणि अभियांत्रिकी...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

Recent Comments