Monday, July 15, 2024
Home ताज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांना साजेस काम नूतन कार्यकारणीने...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांना साजेस काम नूतन कार्यकारणीने करावे – श्री.राजेश क्षीरसागर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांना साजेस काम नूतन कार्यकारणीने करावे – श्री.राजेश क्षीरसागर

शिवसेनेच्या कोल्हापूर शहर कार्यकारणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्यनेते व राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत असून, शिवसेनेच्या कोल्हापूर शहर कार्यकारणीमधील प्रमुख पदांवर आज प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आल्या. यामध्ये उपजिल्हाप्रमुख पदावर तुकाराम अरुण साळोखे, शहर समन्वयक पदावर सुनील शामराव जाधव, महिला आघाडी महानगरसमन्वयक पदावर सौ.मंगलताई साळोखे, शहरप्रमुख पदावर सौ.पवित्रा रांगणेकर, शहर समन्वयक पदावर श्रीमती पूजा भोर आणि गडहिंग्लज तालुका प्रमुख पदावर संजय शिवरुद्र संकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना ही राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणारी संघटना असून, सर्वसामान्यांना न्याय देणे हेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे प्रथम कर्तव्य आहे, त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांना साजेस काम नूतन कार्यकारणीने करावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. शिवसेनेच्या कोल्हापूर शहर कार्यकारणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेना कोल्हापूर शहर कार्यकारणीवर नियुक्ती झालेले सर्वच पदाधिकारी शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असून शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रानुसार शिवसेनेचे अखंडीत काम करत आहेत. यापूर्वी शिवसेनेच्या कोल्हापूर शहरातील महानगरप्रमुख, महानगरसमन्वयक, उप-जिल्हाप्रमुख, कोल्हापूर उत्तर शहरप्रमुख या प्रमुख पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आजच्या जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये शिवसेनेच्या कट्टर व निष्ठावंत शिवसैनिकांना संधी देण्यात आली असल्याने शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. जाहीर झालेल्या कार्यकारणीच्या माद्यमातून आगामी काळात शहरातील उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडी, युवासेना आदी सर्वच अंगीकृत संघटनावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. यासह कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर प्रभागवार शाखांची पुनर्बांधणी करून शहरात शिवसेनेचे भगवे वादळ पुन्हा निर्माण करण्यात येणार आहे. नवनियुक्त कार्यकारणीने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. कोणतेही राजकीय पाठबळ नसताना माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता विधानसभेत जातो ही जनतेसाठी केलेल्या कामाची जनतेकडून मिळालेली पोहच पावती आहे. त्यामुळे जागरूक राहुन सर्वसामन्य नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय द्यावा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांना साजेस आणि मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांना अभिप्रेत समाजहिताचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना केले.
यांनतर नवनियुक्त उपजिल्हाप्रमुख तुकाराम अरुण साळोखे, शहर समन्वयक सुनील शामराव जाधव, महिला आघाडी महानगरसमन्वयक सौ.मंगलताई साळोखे, शहरप्रमुख सौ.पवित्रा रांगणेकर, शहर समन्वयक श्रीमती पूजा भोर आणि गडहिंग्लज तालुका प्रमुख संजय शिवरुद्र संकपाळ यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, प.म.देवस्थान समिती मा.कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, उप-जिल्हाप्रमुख किशोर घाटगे, कोल्हापूर उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments