उद्या रविवारी विवेकानंद कॉलेजच्या प्रांगणात भरणार भीमा मेगा जॉब फेअर सुमारे २०० कंपन्यांचे अधिकारी, १० हजार रोजगार देणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात अनेकांच्या नोकर्या गेल्या, रोजगारावर पाणी सोडावे लागले. भारत हा महासत्ता उदयास येताना, रोजगार निर्मिती हे या देशासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. किंबहुना बेरोजगारीचा मुद्दा सर्वच राजकीय पक्षांसमोर मोठी समस्या म्हणून समोर येतो. अशा वेळी पश्चिम महाराष्ट्रातील तरूण – तरूणींना रोजगार- नोकरी मिळावी, यासाठी कोल्हापुरात भीमा मेगा जॉब फेअरचे आयोजन होत आहे. रविवार दि. २८ ऑगस्ट रोजी स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या परिसरात भीमा मेगा जॉब फेअर होणार आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच भव्य प्रमाणात होणार्या मेगा जॉब फेअरसाठी, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहकार्य मिळाले आहे. या भीमा मेगा जॉब फेअरसाठी सुमारे २०० कंपन्यांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तर सुमारे १० हजार उमेदवारांना नोकरी किंवा रोजगार मिळेल, अशी यंत्रणा राबत आहे.उद्या रविवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा मेगा जॉब फेअर सोहळा होणार असून, त्यासाठी कोणतेही शुल्क नाही. ८९ ५५ १३ ३३ ०७ या क्रमांकावर मिसकॉल दिल्यावर नाव नोंदणीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू होईल. दहावी- बारावी, आयटीआय, डिप्लोमा- डिग्री, पदवीधर, पदव्युत्तर अशा सर्व उमेदवारांना नोकरी मिळण्याची संधी या भीमा मेगा जॉब फेअर मधून मिळणार आहे. रिटेल, बँकींग, फायनान्स, मॅनेजमेंट, इंजिनिअरींग, टेक्नीकल, नॉन टेक्नीकल, सर्व्हीस इंडस्ट्रीज, हॉस्पिटॅलिटी, टुरिझम अशा सर्व क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी या मेगा जॉब फेअरला उपस्थित राहतील आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील. शिवाय जॉब फेअरसाठी उपस्थित उमेदवारांसाठी सुमारे ३ कोटी रूपये किंमतीच्या मुल्यांकन चाचण्या आणि ऑनलाईन शिक्षण अभ्यासक्रम मोफत दिले जाणार आहेत. अर्थात त्यासाठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली जाईल. आजवर सुमारे २५ हजार इच्छुकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले असून, सुमारे १ हजार स्वयंसेवक, जॉब फेअरच्या यशस्वीतेसाठी राबत आहेत. विश्वराज धनंजय महाडिक, कृष्णराज धनंजय महाडिक आणि पृथ्वीराज धनंजय महाडिक यांच्या परिश्रमातून आणि नियोजनातून या भव्य भीमा मेगा जॉब फेअरची तयारी पूर्णत्वास गेली आहे. या उपक्रमासाठी आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर, वीजड्म फौंडेशन, स्कायलार्क, मेगा कॉर्स्पोल, पुण्याचे यशस्वी फौंडेशन, शिरोली मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशन, गोकुळ शिरगाव मॅन्यूफॅक्चरिंग असोसिएशन, कागल – हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत संघटना यांचे सहकार्य लाभले आहे. रविवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भीमा मेगा जॉब फेअरचे उद्घाटन होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या भव्यप्रमाणात होणार्या भीमा मेगा जॉब फेअरसाठी सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे.