वर्षभरात तीन वेळेला केलेली दूध खरेदी दरात वाढ हिच कामाची पावती
दूध उत्पादकांना दिलासा देण्याचे काम गोकुळने केले आहे – चेअरमन –गोकुळ दूध संघ -श्री.विश्वासराव पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : पशुखाद्य कारखान्यास ५ कोटी ७६लाखाचे अनुदान का दिले ?
पशुखाद्य तयार करणेसाठी लागणाऱ्या कच्चा मालाचे दर १८ ते ४० टक्के ने मोठया प्रमाणात वाढले आहेत व दूध उत्पादकांना वाजवी दरामध्ये पशुखाद्य उपलब्ध करून देणे हे धोरण संघाचे अवलंबलेले आहे. पशुखाद्य दूध उत्पादकांना वाजवी दरामध्ये पशुखाद्य उपलब्ध करून दिल्याने दूध उत्पादकांनी गाय व म्हैस यांना योग्य प्रमाणांत पशुखाद्य दिले. त्यामुळे त्याचा परिणाम गाय व म्हैशींच्यादूध उत्पादनावर होऊन दूध उत्पादनात वाढ झाली आहे. तसेच पशुखाद्य विक्रीत १४.७२% ने वाढ झाली आहे. या कारणाने संघामार्फत दूध उत्पादकांना बाजारातील इतर उत्पादकांच्या दरापेक्षा कमी दराने पशुखाद्य उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २१-२२ मध्ये दूध संकलनामध्ये ११.९४ टक्के इतकी वाढ झाली आहे.तसेच यापूर्वी हि आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये रुपये ७ कोटी ९७ लाख इतके अनुदान पशुखाद्य विभागास दिले आहे. दूध उत्पादकांचे हित लक्षात घेवून अशा पद्धतिचे अनुदान पशुखाद्य विभागास आवश्यकतेनुसार वेळोवेळी देण्यात आले आहे.
महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना विस्तारीकरण करणे गरजेचे आहे का ?
अहवालात सालात पशुखाद्य विक्री मध्ये झालेली १५ % वाढ, याही वर्षी सातत्याने पशुखाद्य मागणीत होणारी वाढ,भविष्यात संघाने करावयाचे २० लाख संकलनाचे उद्दिष्ट,गडमुडशिंगी चा ४० वर्षापूर्वी कार्यान्वित केलेला पशुखाद्य कारखाना,वारंवार येणारे ब्रेक डाऊन व त्यामुळे कमी झालेली उत्पादनातील कार्यक्षमता या सर्व बाबीचा विचार करता विस्तारीकरन करणे गरजेचे आहे. तसेच दूध उत्पादकांना चांगल्या प्रतीचे पशुखाद्य स्वमालकीच्या पशुखाद्य कारखान्यातून उत्पादित देणे हिताचे असल्याने त्वरित गडमुडशिंगी जुन्या पशुखाद्य कारखान्याचे नूतनीकरण व विस्तारीकरण करणे गरजेचे आहे.
सहा रुपये दर वाढ दिली ती ग्राहकाच्या वर बोजा टाकून दर वाढ केली आहे ?
संघाने ग्राहक दरवाढ स्वतः केलेली नाही बाजारामध्ये स्पर्धकांनी दुधाचे खरेदी व विक्री वाढ केली होती. त्यामुळे संघाने स्वतःचे संकलन टिकवून ठेवणे करिता दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, वरील दरवाढ करत असताना विक्री मधून मिळणारे सर्व उत्पन्न दूध उत्पादकांना परतावा परत केलेला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना सध्याच्या महागाईच्या काळात दिलासा देण्याचे काम संघाने केले आहे.
वासाचे दूध किती? व किती संस्थाना परत दिले ?
सन २०२१-२२ हा कालावधी कोरोना कालावधी,वातावरणातील उच्च व अनियमीत तपमान,चाऱ्याची कमतरता, याबाबीमुळे दुय्यम प्रत व वासाचे दूधाचे प्रमाणात वाढ झालेली आहे.अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणे असे दूध परत करता येत नाही. त्याच प्रमाणे संकलन केल्यानंतर गाडी व कॅन स्वच्छ केले जातात त्या गाडीतून हे दूध परत वाहतूक करणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे असे दूध संघातच नाश केले जाते.. दूय्यम प्रत कमी करण्यासाठी संघामार्फत प्रयत्न करीत आहोत संस्था पातळीवर सहकार्य अपेक्षित आहे.
दूध संकलनात घट का झाली आहे? गोकुळचे दूध इतर संघाना गेले आहे का?
महाराष्ट्रा बरोबरच देशपातळीवरही दुधाच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट झाली आहे. कारण ऋतुमानानुसार वातावरणात होत असलेला अनियमित बदलाचा परिणाम दुभत्या जनावरावर होत असल्याने त्याची दूध देण्याची क्षमता कमी होत आहे.
४५० दूध संस्था सभासद केल्या व त्या संस्था मार्फत किती दूध वाढले ?
दूध संस्था रजिस्टर करणे हे संघाचे काम नाही हे शासनामार्फत दूध संस्था रजिस्टर करण्याचे काम केले जाते. शासनाने रजिस्टर केलेल्या संस्था संघामार्फत पोटनियमातील तरतूद नुसार दुधाचा पुरवठा केल्यानंतर सभासदत्त्व देले जाते. संघाच्या वार्षिक दूध संकलनात ११.९४ इतकी वाढ झालेली आहे.
संघाची ठेव कमी का झाली आहे ?
संघाचे आर्थिक वर्ष सन २०२१-२२ मधील दूध संकलन ५ कोटी ३३ लाखाने वाढले असलेने तात्पुरत्या स्वरुपात संघाच्या मुदत बंद ठेवी दूध बिल आदा करते वेळी वापरल्या जातात. अतिरिक्त संकलित झालेले दूध हे पावडर व लोणी(बटर) या स्वरुपात साठवलेले आहे. त्यामुळे दूध पावडर व लोणी यांचा स्टॉक वाढल्याने संघाच्या अखेर शिल्लक मालाची रक्कम वाढलेली दिसते व मुदत बंद ठेवीच्या रक्कमे मध्ये घट दिसते .तसेचआर्थिक वर्ष सन २०२१-२२ मध्ये संघा मार्फत वाशी शाखा येथे १९ कोटीची जागा खरेदी केलेली आहे. त्यामुळे मुदत बंद ठेवी कमी दिसत आहेत.
व्याज कमी का ?
रिजर्व बँकेने बँकांचे ऑडीट करून बचत खात्यावर व्याज देण्यास बँकांना निर्बंध आणले आहे त्यामुळे व्याज दरात तुट दिसते .
महानंदाला पॅकींग ठेका का दिला व इग्लो कंपनीची जागा का घेतली नाही ?
मुंबई येथे इग्लु पॅकींग कंपनीचा दर रू १.७४ प्रति लि. तर महानंद पॅकींग दर रू १.५५ प्रति लि. असा असल्याने या व्यवहारात ०.१९ पैसे संघाचा फायदा झाला आहे. हा निर्णय घेण्याचे मुख्य कारण म्हणजे ईग्लुने पॅकींग सुविधा बंद करीत असलेबाबत पत्र दिले होते. त्यामुळे महानंदा येथे पॅकिंग सुरू केले.इग्लू कंपनीचा कोणताही जागा खरेदी साठी चा प्रस्ताव गोकुळकडे दिला होता परंतु त्यांची डेअरी व इमारत व मशिनरी जुनी होती. त्यांनी दिलेले दरही ज्यादा होते व कमी करणेस नकार दिला होता.
दुधाची गुणवत्ता कमी झाली आहे ?
सन २०२१-२२ हा कालावधी कोरोना कालावधी,वातावरणातील उच्च व अनियमित तापमान,चाऱ्याची कमतरता, याबाबीमुळे दुय्यम प्रत व वासाचे दूधाचे प्रमाणात वाढ झालेली आहे.
राज्यातील खासगी दूध संघाकडून खरेदी केलेले दूध व त्याची गुणवत्ता योग्य आहे का राज्याबाहेरील म्हैस दूध खरेदी गेली अनेक वर्षापासुन केली जाते. या दूधावर प्रति लि रू २ प्रमाणे दरफरक द्यावा लागत नाही. तसेच फ्रेश दूध घेऊन दूध पुरवठा सुरळीत ठेवणे व विक्री वाढवणे हे दोन्ही हेतु साध्य होत आहेत. त्याचबरोबर ग्राहकाचे समाधान झाल्याने विक्री वाढण्यास मदत होते. पूर्वी प्रमाणेच सहकारी व खाजगी दुध संघाकडून ज्या नियम व अटीनुसार दूध खरेदी केले जात होते त्याच दूध संघाकडून सध्या दूध खरेदी केले जाते. गोकुळने गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड केलेली नाही.संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक २९ ऑगस्ट २०२२ इ.रोजी संपन्न होत आहे.गोकुळची सर्व साधारण सभा हि खेळीमेळीच्या वातावरणात संघाचे सभासद पार पाडतील. गोकुळ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेस विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे समाधानकारक व समर्पक उत्तरे सभेत दिली जातील व सभासदांनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांची योग्य ती नोंद घेतली जाईल.