गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व डिजिटल क्लासरूम उदघाटन सोहळा संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : दि मोहमेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग संचालित) नेहरू हायस्कुल व ज्युनि. कॉलेज कोल्हापूर व अग्लो उर्दू हायस्कुल यांच्यावतीने आयोजित एमएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व डिजिटल क्लासरूम उदघाटन सोहळा आज संपन्न झाला.
मुस्लिम समाजाच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून राजर्षी शाहू महाराजांनी त्याकाळी मुस्लिम बोर्डिंग ची स्थापना केली. त्यामुळे मुस्लिम समाजाने देखील, मुस्लिम बोर्डिंग केंद्रस्थानी ठेवून काम करावे तसेच समाजाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवण्याचे मुस्लिम बोर्डिंग हे एक व्यासपीठ बनावे असे आवाहन आम.सतेज पाटील यांनी यावेळी केले.
मुस्लिम बोर्डिंगच्या ठिकाणी असलेल्या वस्तीगृह आणि शाळेच्या सोलर करिता आमदार जयश्री जाधव यांच्या फंडातून वीस लाख रुपयांचा निधी तर नेहरू हायस्कूल करीता आमदार जयंत आसगावकर यांच्या फंडातून दहा लाख रुपये तर माझ्या आमदार फंडातील वीस लाख रुपयांचा निधी मुस्लिम बोर्डिंग करीता देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नेहरू हायस्कूल करीता २० संगणक देण्यात येणार आहेत.
सुगरांबी हजी बाळासाहेब अतार यांच्याकडून टीव्ही प्रधान करण्यात आले.यावेळी, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, उपाध्यक्ष आदिल फरास, प्रशासक कादर मलबारी रफिक मुल्ला,जहागीर आत्तार, आशुतोष कोराने, रफिक शेख, हाजी लियाकत मुजावर, अल्ताफ झांजी, जहांगीर आत्तार, यांच्यासह मुस्लिम बोर्डिंगचे सर्व संचालक उपस्थित होते.