कश्मिरी कयामत’ पुस्तकातून माणुसकीच्या नात्याचे दर्शन – आमदार सतेज पाटील
मुस्लिम बोर्डिंगतर्फे आयोजित कार्यक्रमात पत्रकार गुरुबाळ माळी यांच्या पुस्तकाच्या उर्दू आवृत्तीचे प्रकाशन
कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘समाजात अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब साहित्यात उमटलेले असते. लेखक हा भवताल टिपत असतो. पत्रकार गुरुबाळ माळी यांच्या कश्मिरी कयामत या पुस्तकातून माणुसकीच्या नात्याचे दर्शन घडते.’ असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी काढले.दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लिम बोर्डिंग संचलित )नेहरु हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजव अँग्लो उर्दू हायस्कूल शिरोली पुलाची यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे या आयोजन केले होते. याप्रसंगी आमदार पाटील यांच्या हस्ते पत्रकार गुरुबाळ माळी यांच्या ‘कश्मिरी कयामत’या मराठी पुस्तकाच्या उर्दू आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. मुस्लीम बोर्डिंगच्या सभागृहात कार्यक्रम झाला. प्रा. समद खानापुरी यांनी उर्दू अनुवाद केला आहे.
उद्योगपती मुबारक इसाक अत्तार, श्रीमती सुगराबी हा.बाळासाहेब अत्तार, आशुतोष किशोर कोराणे, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, उपाध्यक्ष आदिल फरास, प्रशासक कादर मलबारी, शालेय समिती चेअरमन रफिक हाफीज खुतबुद्दीन मुल्ला, मलिक ईलाई बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकार गुरुबाळ माळी म्हणाले, “कश्मिरी कयामत पुस्तक मराठी, हिंदी भाषेत प्रकाशित झाले आहे. काश्मिरमध्ये सहा वर्षापूर्वी महापुराची आपत्ती कोसळली होती. या कालावधीतील जीवघेणा संघर्ष, काश्मिरमधील मुस्लिम समाजाने केलेली मदत, एका मस्जिदीत मिळालेला आसरा हा सारा प्रसंग मांडला आहे. कोरोना असो की अन्य नैसर्गिक आपत्ती, त्या कालावधीत मुस्लिम समाजाने जे सामाजिक कार्य केले आहे ते अतुलनीय आहे.’
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘ काश्मिरमधील महापुराच्या आपत्तीमुळे उदभवेल्या भयानक स्थिती ही हृदय पिळवणून टाकणारी आहे.नागरिकांनी, या संकटसमयी जात-धर्माच्या पलीकडे जाउन माणसुकीचा नवा पूल बांधत समाजातील चांगुलपणा अबाधित असल्याचे दाखवून दिले. कश्मिरी कयामत या पुस्तकातून महापुराच्या आपत्तीमुळे कोसळलेले संकट मनाचा थरकाप उडवणारे होते तसेच या कठीण कालावधीत माणुसकी हा धर्म मानून सहकार्याचा मदत करणाऱ्या समाजाचे व माणुसकीच्या नात्याचे दर्शन घडते. या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती लवकरच प्रकाशित व्हावी आणि त्याचा प्रकाशन समारंभ दिल्लीमध्ये व्हावा.’ मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी प्रास्ताविक केले.