Wednesday, October 23, 2024
Home ताज्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आई अंबाबाईची अलंकार रुपात पूजा

शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आई अंबाबाईची अलंकार रुपात पूजा

शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आई अंबाबाईची अलंकार रुपात पूजा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया अर्थात शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा दिवस. आजच्या दिवशी करवीर निवासिनी माता महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची अलंकार पूजा साकारली आहे ती नागांनी केलेल्या स्थितीवर स्तुतीवर प्रसन्न होऊन आशिर्वाद देणाऱ्या स्वरूपामध्ये. महर्षि पराशर यांच्या तपा मध्ये प्रथम इंद्र देवाने विघ्न आणण्याचा प्रयत्न केला परंतु महर्षींनी आपल्या संयमाने त्याच्यावर विजय मिळवला नंतर पराशरांच्या उग्र तपाचा परिणाम ब्रह्मगिरी वर असलेल्या नाग लोकांना भोगायला लागला ,त्या उष्णतेने त्रस्त होऊन नागांनी सर्वतीर्थातील जल शोषून घेतले महर्षींनी गरुड अस्त्राने मंत्रून दर्भ नागां वर सोडले त्यामुळे विव्हल झालेले नाग पराशर यांना शरण आले.
महर्षींनी त्यांना क्षमा केली नागांनी सर्व तीर्थ परत आणले आणि स्वतःचे असे नवीन नागतीर्थ निर्माण केले आज या तीर्थाला पन्हाळ्यावर नागझरी म्हणून ओळखले जाते. नाग आणि पराशर यांची मैत्री झाली खरी पण नागांच्या विषयुक्त फुत्कायामुळे माता सत्यवती भयभीत झाली. तेव्हा तुम्ही मुके व्हा असा शाप परशरांनी नागांना दिला .आपल्या कृतीचा पश्चाताप होऊन आपले स्वभाव दोष जाण्यासाठी नागांनी पराशरांना मार्ग विचारला तेव्हा त्यांनी करवीर परिक्रमा करा असे सांगितले. नाग मंडळी परिक्रमेला निघाली जिथे जिथे ज्या नागाचे दुष्टत्व गेले तेथे त्या नागाचे तीर्थ निर्माण झाले. अखेरीला सर्व नाग जगदंबेच्या मंदिरात पोहोचले तिथे देवीचे दर्शन घेऊन ते धन्य झाले त्यांनी याप्रसंगी देवीची स्तुती केली त्याचा तिला सर्व सिद्धिप्रद स्तोत्र असे नाव आहे या स्तोत्रांमधे महाकाली महालक्ष्मी आणि सिद्ध लक्ष्मी म्हणजे महासरस्वती यांची स्तुती आहे त्यानंतर जगदंबेची अनेक प्रकारे स्तुती करून तिच्या १०८ नावांचे वर्णन आहे या स्तोत्राचा पाठ केल्यानंतर लक्ष्मी प्राप्ति आणि सर्व सिद्धी प्राप्त होतील असे वरदान या स्तोत्र ला आहे सोबत या स्तोत्राची संहिता जोडलेली आहे
श्रीमातृचरणारविंदस्य दासः प्रसन्न सशक्तीकःही पूजा माधव मुनींश्वर व मकरंद मुनींश्वर यांनी बांधली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

“कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटाचा ट्रेलर लाँच २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी :राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान कोल्हापूर/प्रतिनिधी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या 'हेल्पर्स ऑफ...

Recent Comments