करवीर निवासिनी अंबाबाईची दुसऱ्या दिवशी महाविष्णु रूपात पूजा,देवीसाठी उत्सव मूर्तीसाठी बारा तोळ्यांच्या दोन ठुशी अर्पण
कोल्हापूर/ प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाचा दुसऱ्या दिवशी रविवारी करवीर निवासिनी अंबाबाई ची महाविष्णू रुपात पूजा बांधण्यात आली होती.नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची ही पूजा बांधण्यात आली होती पराशर ऋषि पुत्रप्राप्तीसाठी विष्णूची घोर तपश्चर्या करीत असताना अंबाबाईनी त्यांना या रूपात दर्शन दिले होते त्यामुळे त्यांचा सर्व संशय दूर होऊन ते नतमस्तक होतात व सर्व संशय हरण करणाऱ्या अष्टकाने आणि तिची स्तुती करतात असे पूजेतून दाखविण्यात आले आहे.
ही पूजा माधव मुनेश्वर मुनीश्वर व मकरंद यांनी बांधली होती कोल्हापुरातील रंगावलीकार महेश पोतदार हे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपात रांगोळीने देवीची विविध रूपे साकारून आपली सेवा देत आहेत शनिवारी त्यांनी देवीची ब्रह्मचारिणी आणि रविवारी शैलपुत्री ही रंगावली साकारली होती.
शिवाय रविवारी सकाळी 11 वाजता कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील बांधकाम व्यवसायिक अजयसिंह देसाई यांनी देवीच्या मूळ मूर्ती साठी दहा तोळे आणि उत्सव मूर्ती साठी दोन तोळे अशा बारा तोळ्यांच्या दोन ठुशी अर्पण केल्या या ठुशींची किंमत सहा लाख रुपये आहे.
यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव कोषाध्यक्ष वैशाली क्षिरसागर, अंजली देसाई, अभिषेक देसाई, ऋतुजा देसाई, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव विजय पवार,डॉ संदीप पाटील उपस्थित होते.