कोल्हापूर ते प्रति पंढरपूर नंदवाळ दिंडी : नगर प्रदक्षिणेसह भव्य प्रमाणात करण्याचा निर्णय – माहिती भित्ती पत्रकाचे प्रकाशन –
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोरोनाच्या दोन वर्षाच्या मर्यादित स्वरूपातील दिंडी नंतर यंदाच्या वर्षी आठ आणि नऊ जुलै रोजी कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर भव्य नगर प्रदर्शने दिंडी काढण्याचा निर्धार विठ्ठल मंदिर येथे झालेल्या भव्य बैठकीत घेण्यात आला. दिंडी प्रमुख ह-भ-प महाराज यांच्यासह दीपक बाळासाहेब पवार ऍडव्होकेट राजेंद्र किंकर संभाजी पाटील पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते येत्या नऊ जुलै रोजी कोल्हापूरातून मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड भवानी मंडप टिंबर मार्केट पर्यंत भव्य प्रदर्शन आणि आषाढीवारी दिनी दहा जुलै रोजी कारले विठ्ठल मंदिर येथे पहाटे आरतीनंतर गणेश मंदिर चौक खंडोबाखंडोबा तालीम मंडळ मार्गे भव्य राधानगरी रोड नंदवाळ येथे दिले जाणार आहे यामध्ये खोलखंडोबा येथे उभे रिंगण आणि भंडाऱ्याची उधळण करत भव्य पिवळ्या वातावरणात दिंडीचे अभिनव पद्धतीने स्वागत केले जाणार आहे.तर प्रतिवर्षीप्रमाणेचंबुखडी येथेवाखरी प्रमाणे भव्य रिंगण सोहळा संपन्न होणार आहे या दोन्ही सोहळ्यासाठी सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन या वेळी करण्यात आली आहे यावेळी झालेल्या चर्चेमध्ये अजित चव्हाण चोपदार भगवान तिवले ‘रांगोळी घोडेवाले राजेंद्र मकोटे काशीद साहेबराव चोपदार भगवान तिवले मालोजी केरकर ‘ सागर ठाणेकर , विनय गोखले आदींनी आपल्या विविध सूचना मांडल्या . दिंडीची आगामी बैठक येत्या पाच जुलै रोजी विठ्ठल मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणार असून त्या मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन दिंडीप्रमुख हभप लाड महाराज – दिपक गौड यांती केले आहे शेवटी पसायदानाने ही बैठक संपन्न झाली.