शहरातील सर्व क्रीडांगणाच्या विकासासाठी कटिबद्ध – आमदार जयश्री जाधव
गांधी मैदान विकास व सुशोभीकरण कामाच्या शुभारंभ
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील सर्व क्रीडांगणाच्या सर्वांगीण विकासाचे आराखडे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी तयार करून घेतले आहेत. त्यासाठी निधी मिळावा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शासकीय निधीतून शहरातील सर्व क्रीडांगणाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी दिली.
गांधी मैदान विकास व सुशोभीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या संकल्पनेतून व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विषेश प्रयत्नातून गांधी मैदान विकास व सुशोभीकरणासाठी प्राप्त झालेल्या रु. १ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला.
मैदानातील वॉकींग ट्रॅक, व्यायाम शाळा, टेनिस कोर्ट नूतनीकरण, पॅव्हेलियन इमारत नूतनीकरण सुशोभीकरण आदी कामे या निधीतून केली जाणार आहेत. गांधी मैदानाच्य सर्वांगीण विकासासाठी आण्णांनी १७ कोटी रूपयांचा आराखडा तयार करून घेतला होता. १७ कोटी पैकी ६ कोटी रुपये देण्याचे आश्वासन क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिले आहे. आज पहिल्या टप्प्यात एक कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ होत आहे. उर्वरित निधीसाठी आपण प्रयत्नशील राहणार असून तीन टप्प्यामध्ये हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कै.आमदार चंद्रकांत जाधव याचे खेळावर विशेष प्रेम होते. कोल्हापूरातील क्रीडांगणांचा सर्वांगीण विकास व्हावा, कोल्हापुरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत यासाठी आण्णा नेहमीच प्रयत्नशिल होते. मात्र, दुर्देवाने आण्णा आपल्याला सोडून गेले आणि हे काम अपूर्ण राहिले. अण्णांचे हे स्वप्न आज पूर्ण होत असल्याने आनंद होत आहे.
या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, माजी महापौर निलोफर आजरेकर, दुर्वास कदम, संजय मोहिते, विक्रम जरग, अजय इंगवले, शारंगधर देशमुख, इंद्रजित बोंद्रे, उदय इंगवले, निखील इंगवले, वैभव देसाई, महेश निकम, शेखर पवार, सुरेश पवार, विवेक पवार, अजित राऊत, चंद्रकांत सूर्यवंशी, सुरेश पाटील, विजय हराळे, करण शिंदे, माँटी मगदूम, संपत पाटील, परिक्षीत पन्हाळकर, उत्तम कोराणे, बी आर पाटील, संतोष जरग, प्रदीप देसाई, निखील जाधव, राजू समर्थ, आजित शिंदे, विवेक जाधव, विवेक पोवार यांच्यासह शिवाजीपेठ आणि मंगळवारपेठेतील युवक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.