आमदार श्रीमती जयश्री जाधव यांच्या हस्ते एजुकेशन फाउंडेशन पारितोषिक वितरण
कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रथम एजुकेशन फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनींना आणि कर्मचारी वर्गाला पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम वाय. पी. पवार नगर कोल्हापूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननिय आमदार श्रीमती जयश्री जाधव या होत्या. सुरुवातीला प्रास्ताविक श्री सुधाकर भदरगे सर क्लस्टर हेड यांनी केले. त्यानंतर माननीय आमदार श्रीमती जयश्री वहिनींच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा सोहळा पार पडला, यानंतर माननीय आमदार श्रीमती जयश्री जाधव वहिनींनी मार्गदर्शन पर भाषण केले त्या बोलताना म्हणाल्या की ऑटोमोबाईल क्षेत्रांमध्ये मुलींना पहिल्यांदाच प्रथम एजूकेशन फाउंडेशन कोल्हापूर यांनी संधी दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करते तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांना देखील नावाजले आणि औद्योगिक क्षेत्रातील कोल्हापूर मधील सर्वात जास्त चालणाऱ्या फाउंड्री ट्रेड देखील काम करावे असे त्यांनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ला सुचविले आणि त्यासाठी लागणारे मार्गदर्शन आणि मदत करण्याचे देखील आश्वासन दिले.
कोल्हापूर क़्लस्टर बेस्ट मेंटोर अतुल मोरे आणि भुवनेश्वरी गौरीमठ तर बेस्ट विध्यार्थिनी रुपाली कुरळे यांना
पारितोषिक मिळाले. तसेच ऑटोमोटीवसाठी जास्तीत जास्त प्रवेश मिळवून दिलेले मेंटोर मनस्विनी कांबळे, सीमा स्वामी आणि सुशांत जोधल हे मानकरी ठरले. औदुंबर मांगले मल्टी स्कील रोल सेंटर हेड म्हणून गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रथम एज्युकेशन फौंडेशन मुंबई येथून माननीय श्री सचिन चांदोरकर सर (युथनेट हेड), शतानंद सर (मिडीया हेड), स्मिया मॅडम (युथनेट), औदुंबर मांगले, वैशाली कोळी, आसमा पठाण आणि मनीषा कांबळे व इतर स्टाफ उपस्थित होते. सूत्रसंचालन आसमा मॅडम व औदुंबर मांगले यांनी आभार प्रदर्शन केले.