कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणारआहे बारा एप्रिल रोजी कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीचा मतदानाचा कार्यक्रम पार पडला या निवडणुकीसाठी उद्या १६ एप्रिल रोजी रोजी मतमोजणी ही होणार आहे.काँग्रेस कडून श्रीमती जयश्री जाधव व भाजपकडून सत्यजित नाना कदम हे दोघे निवणुकीच्या रिंगणात होते.मतमोजणीची प्रक्रिया ही शासकीय गोदाम राजाराम तलाव सरनोबतवाडी येथे होणार आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी केली गेली आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तही प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. शिवाय याच दिवशी चैत्र पौर्णिमेची वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा देवाची यात्रा होत असल्याने पोलिसांवर मोठा ताण आहे उत्तर मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार असून ज्योतिबाच्या यात्रेच्या निमित्ताने गुलाल कोणाच्या नावाला लागणार याकडे कोल्हापूर जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्याचे व संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे ही प्रतीक्षा आता संपली असून उद्या १६ एप्रिल रोजी या उत्तर विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जाहीर होणार आहे.