आयएम कोल्हापूरच्या केएमए-कॉन हॉस्पिकॉन २०२२ या वैद्यकीय परिषदांचा समारोप
कोल्हापूर/ प्रतिनिधी: शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखा कोल्हापुरच्यावतीने केएमए-कॉन आणि सर्व हॉस्पिटलच्या वतीने हॉस्पिकॉन- २०२२ या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे हॉटेल सयाजी येथे करण्यात आले होते या परिषदेचा समारोप आज झाला. खासगी डॉक्टर व हॉस्पिटल्स सरकारी योजनांच्या विरोधात नाहीत. परंतु दारिद्ररेषेखालील किंवा सवलतींच्या सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. त्याचा फायदा रुग्णांना झाला पाहिजे. पण उपचारांची गुणवत्ता याची काळजी देखील घेतली पाहिजे. अशी चर्चा या दोन दिवसीय या परिषदेमध्ये झाली. या परिषदेमध्ये डॉ. मदन गुप्ता,डॉ. राजवर्धन घाटगे, डॉ. देवेंद्र जाधव, डॉ. जयश्री तोडकर, डॉ. इंद्रनील जाधव, डॉ. रेशमा पवार, डॉ. कौस्तुभ वाईकर, डॉ. सुरज पवार, डॉ. सलीम लाड, डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. देवेंद्र जाधव, डॉ. अशोक भूपाळी, डॉ. गिरीश हिरेगौडर यांची विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने संपन्न झाली.यामध्ये दुर्बिणीद्वारे सांध्यांच्या आजाराचे निदान, हृदयाच्या निदानाच्या आधुनिक पद्धती, रक्तदाबाच्या द्वितीय अवस्थेचा एक अभ्यास, शीर व मानेची शस्त्रक्रिया, फुफ्फुसांचे आजार ,सामान्य कॅन्सर यावर चर्चासत्रे संपन्न झाली. यावर्षी डॉ. अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ व तज्ञ डॉ. राधिका जोशी यांना सन्मानित करण्यात आले.परिषदेस सल्लागार समिती सभासद डॉ.संदीप साळोखे,डॉ. रविंद्र शिंदे,
उपाध्यक्षा डॉ.गीता पिल्लाई, ,परिषदेचे सचिव डॉ.शैलेश कोरे,केएमए सचिव डॉ.किरण दोशी,खजनिस डॉ.ए.बी.पाटील,एमएमसी निरीक्षक डॉ.पी.एम.चौगुले, डॉ.प्रकाश पाटील,
डॉ.शीतल पाटील,डॉ.राजेंद्र वायचळ,डॉ.अश्विनी पाटील,डॉ.अरुण धुमाळे,डॉ.अशोक जाधव,डॉ. आबासाहेब शिर्के,डॉ. देवेंद्र जाधव यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून तीनशेहून अधिक डॉक्टर्स व तज्ञ उपस्थित होते.
चौकट –
महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही दोन्ही आरोग्य योजना छोट्या हॉस्पिटलमध्ये देखील उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. 30 ते 50 बेडच्या हॉस्पिटल्सचा याच्यात समावेश होणे गरजेचे आहे. तरच तळागाळापर्यंत सर्व उपचार पोहोचतील. यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज उभारण्यास सुरुवात करणार असल्याचे सांगितले आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या उपचार पद्धती या योजनांमार्फत उपलब्ध होणार आहेत. सरकार यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून सर्व वैद्यकीय सेवा सुविधा पुरवणार आहे. यामध्ये प्रशिक्षित स्टाफचा देखील समावेश आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये देखील योजनेमार्फत उपचार करून सर्वसामान्य रुग्णांपर्यंत ज्यांची ऐपत नाही अशा रुग्णांना याचा लाभ करून देणे आवश्यक आहे. काही रुग्णांच्या आजारांचे लवकर निदान होत नसल्यामुळे कॅन्सर किंवा क्षयरोग सारख्या रोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. सर्व स्तरावर जर जास्तीत जास्त लोकांचे स्क्रीनिंग झाले तर सर्व आजार हे आटोक्यात येऊ शकतात.
काही कॅन्सरचे प्रकार हे फक्त लसीकरणाने देखील बरे होऊ शकतात. किंवा आयुष्यभर औषध घेतल्याने देखील कॅन्सर नियंत्रणात येऊ शकतो व आपण एक तंदुरुस्त आयुष्य जगू शकतो.