Tuesday, October 8, 2024
Home ताज्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीतर्फे डॉ. अथर्व गोंधळी याचा 'एम. व्ही.एल. ए प्रतिभा...

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीतर्फे डॉ. अथर्व गोंधळी याचा ‘एम. व्ही.एल. ए प्रतिभा सन्मान बालरत्न अचिव्हर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान  

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीतर्फे डॉ. अथर्व गोंधळी याचा ‘एम. व्ही.एल. ए प्रतिभा सन्मान बालरत्न अचिव्हर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेचा खेळाडू डॉ अथर्व संदीप गोंधळी यास मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीतर्फे ‘एम. व्ही.एल. ए प्रतिभा सन्मान बालरत्न अचिव्हर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ. जे सानीपिना राव विशाखापटनम यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१० मार्च २०२२ रोजी पुणे येथील सांस्कृतिक सभागृहात हा राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये विविध राज्यातील निवडलेल्या विविध क्षेत्रातील २५ मान्यवरांचा मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र,गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ. पंडित श्री श्यामसुंदर महाराज, सोलर आळंदीकर, ज्येष्ठ साहित्यिक श्री. रमेश आव्हाड आदी उपस्थित होते.
अथर्वने डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील बर्गमॅन ११३ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.त्याने स्विमिंग १.९ किलोमीटर, सायकलिंग ९० किलोमीटर रनिंग २१ किलोमीटर अशी सलग नऊ तास असणाऱ्या ही स्पर्धा केवळ ६ तास ३४ मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली आहे. या स्पर्धेत देशभरातील ९०० स्पर्धक सहभागी झाले होते.खूप कमी वयात आणि कमी वेळेत अथर्वने ही स्पर्धा पूर्ण केली होती यामध्ये डॉ.अथर्व यंगेस्ट बर्गमॅन ठरला होता.यामुळे त्याचे सर्व स्तरातून खूप कौतुक झाले होते.डॉ. अथर्व तायक्वांदो मध्ये अकराव्या वर्षी ब्लॅक बेल्ट झाला आहे. त्याने अनेक सुवर्ण आणि रौप्य पदके मिळवली आहेत. ३० नोव्हेंबर २०१९ रोजी त्याने सलग बारा तासात २९६ किलोमीटर सायकलिंग करून सहा वर्ल्ड रेकॉर्ड बनविले होते. आतापर्यंत १० वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंद आहेत. RTO कोल्हापूर व कराड सायक्लोथॉनचे अथर्व ब्रँड अँबेसिडर आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांला डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे.यापूर्वी यंगेस्ट मल्टी टॅलेंटेड स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ,बाल रत्न इंडियन एक्सलन्स, करवीर आयकॉन, क्रीडा रत्न ,क्रीडा भूषण, ब्रँड कोल्हापूर, बेस्ट अँथलेट,रायझिंग स्टार अशा अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय व प्रादेशिक पुरस्काराने अथर्वला सन्मानित करण्यात आले आहे.जिद्द चिकाटी परिश्रम व वेळेचे नियोजन असेल तर यशाला गवसणी घालता येते अथर्वने या गोष्टीला प्रथम प्राधान्य दिले आणि त्याने हे यश प्राप्त केले होते. यासाठी अथर्वला प्रशिक्षक पंकज रावळू,आशिष रावळू, क्रीडाशिक्षक विक्रम सिंह पाटील, रविराज पवार यांचे मार्गदर्शन व कॉलेजच्या प्राचार्य माहेश्वरी चौगुले यांचे प्रोत्साहन व संस्थेचे अध्यक्ष संदीप नरके,आकाश कोरगावकर यांचे सहकार्य लाभले आहे. आई डॉ.सौ.मनिषा गोंधळी,वडिल डॉ. संदीप गोंधळी व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे असे अथर्वने बोलून दाखविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री...

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्तुर येथील...

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा   कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी...

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा...

Recent Comments