गणेश नागरी संस्थेचे कार्य लोकाभिमुख – प्रा. एसटी जाधव
कोल्हापूर/प्रतिनिधी: कदमवाडी येथील गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्य हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत लोकाभिमुख आहे. समाजाचे आपण देणे लागतो ही भावना सभासद व संचालक मंडळामध्ये रुजली आहे, असे मत सहकार तज्ञ प्रा. एस.टी.जाधव यांनी व्यक्त केले. ५५ वर्षाच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा गणेश नागरी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. या पार्श्वभूमीवर नूतन व माजी संचालक सत्कार सोहळा व सभासदांना मार्गदर्शनपर व्याख्यानात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. ते म्हणाले ” महाराष्ट्रात सहकार टिकवायचा असेल तर एकमेकांबद्दल विश्वास अपेक्षित आहे. संस्थेवर निष्ठा आणि सहकार्याची भावना असली पाहिजे.
५५ वर्षे सभासदांनी विश्वास दाखवला याचमुळे आज संस्थेकडे कोट्यावधी रुपयांच्या ठेवी आहेत. अजून ठेवी वाढवण्याचा प्रयत्न करणार असून येत्या रविवारी १३ मार्च रोजी संस्था स्ववास्तूत स्थलांतरित होत आहे. तज्ञ संचालक व सभासदांच्या एकजुटीमुळे संस्था नावारूपास येत आहे, असे संस्थेचे संस्थापक शिवाजीराव कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले. नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष शशिकांत कदम, उपाध्यक्ष अशोक पाटील,संचालक शहाजी मुळीक, प्रशांत महाडिक, पंडित संकपाळ, अरुण घाडगे,भैरू झोरे, स्वप्नील माळी, सुनील पाटील, सौ.सीमा कदम,शिवाजीराव कदम,रामचंद्र जगताप आणि माजी संचालक रंगराव पाटील, महेश मांडरेकर, सौ. दिपाली रोकडे, सुनील शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. जयसिंगराव जाधव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. आभार सुनील पाटील यांनी मानले. कार्यक्रमास विठ्ठल कस्तुरे, बाबा पाटोळे, प्रवीण कदम,रणजित साळोखे,बापू मिसाळ, संभाजीराव जगदाळे,सुवर्णा शिंदे,सौ.सुवर्णा शिंदे, सौ.सुनिता शेट्टी,नागेश गवळी,संजय आडूळकर, तानाजी पाटील,रामचंद्र शेळके,शिवाजी देवणे, जोतिराम फाळे, शशिकांत कुंभार यांच्यासह सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.