राजाराम तलावाचा विकास व सुशोभिकरणासंदर्भामध्ये पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील यांची तालावास भेट
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या राजाराम तलावाचा विकास व सुशोभिकरणासंदर्भामध्ये पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्रयत्न सुरु आहेत. याचपार्श्वभूमीवर आज संबंधित अधिकारी यांच्या सोबत तलावाला भेट दिली.
नुकताच पालकमंत्री ना. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजाराम तलाव परिसराचा विकास करण्याकरीता जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन ‘क’ वर्ग योजनेमध्ये तलावाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे रंकाळा तलावाच्या धर्तीवर हा परिसर विकसित केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ९९ लाख ५० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या तलावाच्या सुशोभिकरणाचा प्राथमिक स्वरुपाचा आराखडा तयार करण्यात आला असून तलावाच्या सुशोभिकरणामध्ये जाॉगिंग आणि सायकल ट्रॅक, प्ले-कोर्ट, पथ मार्ग, एमपी थेटर, बोटिंग क्लब, घाट, कुंड, यासह देशी वृक्षांची लागवड ही या ठिकाणी केली जाणार आहे.
उज़ळाईवाडी, सरनोबत वाडीचे ग्रामस्थांच्या म्हैशीं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुण्यासाठी आणल्या जातात. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याकरिता म्हैशी आणि कपडे धुण्यासाठी आरखड्यात स्वतंत्र व्यवस्था करण्याची सूचना यावेळी संबंधितांना केली आहे. यावेळी आशकीन आजरेकर आधिकारी उपस्थित होते
तलावाच्या सुशोभकरणाचा पहिला टप्पा म्हणून पाटबंधारे विभागाने या तलावाच्या दगडांच्या दरजा भरण्याचे काम सुरु करावे अशा सूचना पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत.