Friday, July 19, 2024
Home ताज्या छत्रपती संभाजीराजेचे उपोषण मागे कोल्हापूरमधील ऐतिहासिक दसरा चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव...

छत्रपती संभाजीराजेचे उपोषण मागे कोल्हापूरमधील ऐतिहासिक दसरा चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव संपूर्ण कोल्हापूरसह महाराष्ट्रात जल्लोष साजरा

छत्रपती संभाजीराजेचे उपोषण मागे कोल्हापूरमधील ऐतिहासिक दसरा चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव संपूर्ण कोल्हापूरसह महाराष्ट्रात जल्लोष साजरा

मराठा समाज मागण्यांची अंमलबजावणीचे सरकारने दिले लेखी आश्वासन

कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी मराठा समाजच्या न्यायासाठी व त्यांच्या काही मागण्या घेऊन मुंबई येथील आझाद मैदान येथे २६ फेब्रुवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते.त्यांनी ज्या मागण्यांसाठी हे उपोषण हाती घेतले होते त्या मागण्यांची अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन आज सरकारकडून दिले गेल्याने गेले तीन दिवसापासून सुरू केलेले हे उपोषण छत्रपती खा.संभाजीराजे यांनी आज सायंकाळी मागे घेतले त्यामुळे कोल्हापूर मधील ऐतिहासिक दसरा चौकात पाठिंब्यासाठी सुरू केले आंदोलन हे साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करत आंदोलन थांबविण्यात आले. संभाजीराजे यांच्या या उपोषणमुळे महाराष्ट्रमध्ये उद्रेक उमटला होता त्यामुळे आज उपोषण मागे घेतल्याने संपूर्ण देशभरात व महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दसरा चौक येथे येऊन जनतेचे आभार मानले.व मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य झाल्या आहेत त्यामुळे आता सवलती मिळण्यात काहीच अडचणी येणार नाहीत. आपण सर्वांनी साथ दिल्यानेच हे शक्य झाले आहे असे सांगितले.
तीन दिवसांच्या या उपोषणात छत्रपती संभाजीराजे यांची प्रकृती खालावली होती.त्यांच्यां आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील दसरा चौकात देखील काल पासून सकल मराठा समाज वतीने साखळी उपोषण सुरू केले होते.आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी देखील महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाषिकांनी आंदोलनस्थळी हजेरी लावत पाठिंबा दिला होता.दरम्यान सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधीनी बैठक घेऊन आंदोलन तीव्र झाले तर आम्ही जबाबदार नाही व उद्या सोमवारी संध्याकाळपर्यंत राज्य शासनाने मराठा समाजाच्या न्याय व मान्य केलेल्या पाच मागण्यांची अमलबजावणी संदर्भात निर्णय द्यावा अन्यथा बुधवार पासून तीव्र आंदोलन करू व प्रसंगी कोल्हापूर बंद करू असा आणि त्याला राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला होता.व छत्रपती खा.संभाजीराजे यांची प्रकृती ही खालावल्यानेच आज सरकारच्या वतीने सायंकाळी मागण्यांबाबत लेखी आश्वासन हे देण्यात आल्याने छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलन मागे घेतले.छत्रपती संभाजीराजे याच्या आंदोलनाला पाठिंवा देण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात काळापासून साखळी उपोषण सुरू केले होते. जिल्ह्याच्या विविध भागातील व कर्नाटक सह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध संस्था संघटनानी दसरा चौकात उपस्थिती लावत सभाजीराजेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आणि आजही आंदोलन मागे घेण्याच्या वेळेत कोल्हापूर मधील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी दसरा चौकात उपस्थिती लावत साखर पेढे वाटून आनंदोत्सव च्या वेळी हजेरी लावली होती. संपूर्ण कोल्हापूर शहरात आज हा फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक,
यावेळी क्रीडाईचे विद्याधर बेडेकर,महेश यादव,गणी आजरेकर,दिलीप देसाई,सचिन तोडकर,अँड. राजेंद्र देशमुख,चंद्रकांत पाटील,कादरभाई मलबारी,शाहीर सावंत,यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर व उद्योजक,शैक्षणिक, राजकीय व अन्य क्षेत्रातील लोक व सर्वच संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते हे सहभागी झाले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments