Friday, September 13, 2024
Home ताज्या के.एम.टी. ला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करू : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष...

के.एम.टी. ला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करू : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

के.एम.टी. ला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करू : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

के.एम.टी. च्या विविध प्रश्नासंदर्भात महानगरपालिकेत बैठक

कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असूनही नागरिकांना सुविधा मिळावी या हेतूने के.एम.टी. सेवा प्रशासनामार्फत अविरत सुरु ठेवण्यात आली आहे. त्याचा आर्थिक बोजा महानगरपालिका प्रशासनावर पडत असल्याने के.एम.टी.च्या उत्पन्न वाढीचे प्रयत्न होवून, इलेक्ट्रिक बसेस, तेजस्विनी योजना आदी माध्यमातून के.एम.टी. विभागास उर्जितावस्था आणण्यासाठी शासनाकडे पाठपुराव करू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या विविध प्रश्नी आज कोल्हापूर महानगरपालिका येथे आढावा बैठक पार पडली.
बैठकीच्या सुरवातीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी के.एम.टी. सेवेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, पर्यावरण मंत्री नाम.श्री.आदित्य ठाकरे साहेबांनी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याबाबत अद्यादेश जारी केले आहेत. सद्या कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाची आर्थिक स्थिती आणि वाढते इंधन दर पाहता इलेक्ट्रिक बसेस वापरणे फायदेशीर ठरणार आहे. याकरिता आवश्यक प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करावा. पर्यटन व पर्यावरण मंत्री ना.श्री.आदित्य ठाकरे साहेबाकडून कोल्हापूर शहरास अशा इलेक्ट्रिक बसेस अनुदान स्वरूपात देण्याकरिता तात्काळ पाठपुरावा करू. तेजस्विनी योजनेचा लाभ कोल्हापूर महानगरपालिकेस मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी साठी प्रयत्न करू. सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस खरेदी करून वापरण्यासाठी नियमात शिथिलता आणण्याबाबत संबधित विभागाकडे विशेष पाठपुरावा करू. याकरिता आवश्यक सर्व प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तात्काळ सादर करावेत. के.एम.टी. चे उत्पन वाढून के.एम.टी.सेवेस उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही देत. कर्मचाऱ्यांचा रोस्टर, सेवा निवृत्ती पेन्शन, फिटर बी कर्मचाऱ्यांची उर्वरित रक्कम, सेवा जेष्ठते प्रमाणे कामाचे नियोजन आदी मनपा स्तरावरील प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत. के.एम.टी. कर्मचाऱ्याना इतर मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे ७ वा वेतन आयोगाचा लाभ देण्याबाबत अभ्यास करावा, अशा सूचना दिल्या. या बैठकीस को.म.न.पा. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, उप- आयुक्त रविकांत आडसूळ, सहा. आयुक्त विद्यादेवी पोळ, पी.एन.गुरव, संजय इनामदार, अरुण केसरकर, रवी दुपकर, पोर्च मॅनेजर किरण चव्हाण, के.एम.टी कर्मचारी संघटनेचे निशिकांत सरनाईक, विश्वनाथ चौगुले, एम.डी.कांबळे, जितेंद्र संकपाळ, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments