Wednesday, October 23, 2024
Home देश सिद्धगिरी कोविड हॉस्पिटलचा दुसरा विस्तारित विभाग लोकार्पण सोहळा

सिद्धगिरी कोविड हॉस्पिटलचा दुसरा विस्तारित विभाग लोकार्पण सोहळा

सिद्धगिरी कोविड हॉस्पिटलचा दुसरा विस्तारित विभाग लोकार्पण सोहळा

 

कोल्हापूर/प्रतिनिधी :  ‘निराधारांना आधार’ या तत्वावर काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर सुरु आहे. कोल्हापुरात कोरोना संसर्ग वाढू लागल्यावर बेडची कमतरता प्रकर्षाने जाणवू लागली. बेड न मिळाल्याने कोणास प्राणास मुकावे लागू नये म्हणून अल्पावधीत सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये कोरोना विभाग कार्यरत झाला. एक महिन्याच्या कालावधीत अनेको कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. आरोग्यपूर्ण नैसर्गिक सानिध्य लाभल्यामुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी अल्प दरात विलगीकरण कक्ष हि चालवण्यात येत आहे.
तरी वाढता संसर्ग पाहता रुग्णांसाठी आणखी बेडची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आल्यामुळे मा.आ.चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्याने सिद्धगिरी हॉस्पिटलचा नवीन दुसरा विभाग सुरु होत आहे. यामध्ये प्रामुख्याने 7 बेड व्हेंटीलेटर सहित,23 ऑक्सिजन बेड व सामान्य 10 बेड असे सुमारे चाळीस बेडचे अद्यावत कोविड रुग्णालय लोकांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे. कोरोना संसार्गानंतरही उद्भवणाऱ्या अनेक आजारांवर उपचार करणारे केंद्र म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटल नावारूपास येईल. अद्यावत उपकरणे, तत्पर वैद्यकीय स्टाफ, कोरोना निदानासाठी एच.आर.सिटी., अद्यवत प्रयोगशाळा एकाच छताखाली सर्व वैद्यकीय सुविधा मिळत असल्यामुळे सिद्धगिरी हॉस्पिटल कोरोनाग्रस्तांसाठी एक आधारवड ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

“कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटाचा ट्रेलर लाँच २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी :राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान कोल्हापूर/प्रतिनिधी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या 'हेल्पर्स ऑफ...

Recent Comments