गोकुळ मध्ये वसुबारस निमित्त गाय-वासराचे पूजन उत्साहात
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., (गोकुळ) च्या वतीने सोमवारी वसुबारस दिन निमित्त गाय-वासराचे पूजन ग्रामविकास व कामगार मंत्री मा.नाम.हसन मुश्रीफसो, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे गृह राज्यमंत्री मा.नाम. सतेज उर्फ बंटी पाटीलसो, खासदार संजय मंडलिकसो यांचे हस्ते व संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांचे उपस्थित संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात गाय वासराची विधिवत पूजा करण्यात आली.
याप्रसंगी स्वागत संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले व डॉ. प्रकाश दळवी यांनी गाय वासराच्या विविध जातीची माहिती दिली तसेच आभार संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे यांनी मानले, सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी केले .
याप्रसंगी संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके,शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील,सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व संघाचे अधिकारी उपस्थित होते.