पॅरालिंपिक स्पर्धेत १० मीटर रायफल शूटिंग स्पर्धेत चौथा क्रमांक पटकाविणाऱ्या स्वरूप उन्हाळकर यांचा १० लाख रुपयांचा धनादेश देऊन सत्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या टोकियो पॅरालिम्पिक २०२० स्पर्धेमध्ये भारताने अत्यंत उपयुक्त असे प्रदर्शन केले या मध्ये भारताने आजपर्यंतचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करताना पाच सुवर्णपदकासह एकूण १९ पदके मिळविली. निश्चितच पदक विजेत्यांनी भारताची शान वाढवली आहे. तसेच ज्या अथलेटिकनी उत्कृष्ट प्रदर्शन केले परंतु पदापर्यंत पोहोचता आले नाही अशांचे प्रदर्शन ही गौरवशाली आहे.याच
टोकियो जपान येथे संपन्न झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत १० मीटर रायफल शूटिंग स्पर्धेत चौथा क्रमांक पटकाविणाऱ्या स्वरूप महावीर उन्हाळकर यांचा सत्कार आयुर्विमा महामंडळ (एल. आय. सी ऑफ इंडिया) च्या कोल्हापूर विभागातर्फे आज करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी कोल्हापूर विभागाचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक अभय कुलकर्णी यांच्या हस्ते स्वरूप उन्हाळकर यांना १० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर विभागाचे सेल्स मॅनेजर प्रमोद गुळवणी यांनी केले. एलआयसी तर्फे नेहमीच क्रीडा क्षेत्रासाठी विशेष मदत केली जाते असा उल्लेख त्यांनी यावेळी केला तसेच एलआयसीच्या गोल्डन जुबली फंड मधून विविध शैक्षणिक संस्थांना २५ लाखांपर्यंतचा पर्यंतची मदत शाळेची इमारत,स्कुलबस यासाठी केली जाते. एलआयसी परिवारात १० लाखांपेक्षा जास्त एजंटांतर्फे कोरोना काळात सर्वोत्तम सेवा देण्यात आली व जास्तीत जास्त दावे देण्यात आले.
मार्केटिंग मॅनेजर प्रताप नलवडे यांनी कोल्हापूरच्या ऑलिपिंक मधील कामगिरीचा उल्लेख करत खाशाबा जाधव यांची परंपरा स्वरुपणे पुढे चालविली आहे असे नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी याप्रसंगी ऑलिंपिकमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्याचा दुर्मिळ योग एलआयसी लसीमुळे कोल्हापूर विभागाला मिळाला असे सांगून स्वरूपला पुढील ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व स्वरूपचे अभिनंदन करण्यास आम्हाला अभिमान वाटतो असेही नमूद केले. या कार्यक्रमास स्वरूपचे प्रशिक्षक श्री कुसाळे उपस्थित होते.सहाय्यक प्रशासकीय अधिकारी उमेश दिवेकर आणि शिव छत्रपती अवार्ड विजय जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.