Sunday, July 14, 2024
Home ताज्या वुमन्स डॉक्टर विंग आयएमए ईव्ह कॉन' ही राज्यस्तरीय दोन दिवसीय वैद्यकीय परिषद...

वुमन्स डॉक्टर विंग आयएमए ईव्ह कॉन’ ही राज्यस्तरीय दोन दिवसीय वैद्यकीय परिषद कोल्हापुरात होणार

‘वुमन्स डॉक्टर विंग आयएमए ईव्ह कॉन’ ही राज्यस्तरीय दोन दिवसीय वैद्यकीय परिषद कोल्हापुरात होणार

कोल्हापूर/ प्रतिनिधी: वैद्यकीय क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला बरं करणे हे मोठे आव्हान असते. या क्षेत्रामध्ये टिकण्यासाठी मानसिक धैर्य व चिकाटीची गरज असते.ही चिकाटी आणि काम करण्याची क्षमता महिलांकडे अधिक प्रमाणात आहे. किचकट व वेळखाऊ शस्त्रक्रिया असोत किंवा वैद्यकीय क्षेत्रात होणारे रोज नवनवीन संशोधन असोत, उच्चशिक्षीत महिला डॉक्टरांनी यात प्राविण्य मिळवत हे आव्हान स्विकारले आहे.यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवी वानखेडकर यांनी ‘वुमन्स डॉक्टर विंग’ ही संकल्पना आणली. या विंग ची ११ वी राज्यस्तरीय वैद्यकीय परिषद कोल्हापूर येथे होणार आहे.”वुमन टुडे अँड टूमारो” अशी संकल्पना या परिषदेची असणार आहे,अशी माहिती महाराष्ट्र राज्य वुमन्स डॉक्टर विंगच्या अध्यक्षा तसेच कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा व परिषदेच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
त्या म्हणाल्या’ ” स्त्रियांचे अनेक आजार असतात. ज्या ते उघडपणे सांगू शकत नाहीत. पण डॉक्टर जर एखादी स्त्री असेल तर त्या खुलेपणाने बोलू शकतात. आयएमए ने स्त्री-पुरुष असा कोणताही भेद न करता महिला डॉक्टर्सना नेहमीच प्राधान्य दिले आहे. ही महिला डॉक्टरची मजबूत टीम आणि त्यातील एकएक स्त्री रोग तज्ञ असोसिएशनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातून स्त्रियांच्या आजाराचे व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वासही डॉ.आशा जाधव यांनी व्यक्त केला.
परिषदेचे उद्घाटन आयएमए चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे यांच्या हस्ते १६ ऑक्टोंबर रोजी शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता हॉटेल सयाजी येथे होणार आहे. त्यांनतर डॉ.रवी वानखेडेकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान असणार आहे. दोन दिवसीय या वैद्यकीय परिषदेत महिलांना फायदेशीर अश्या कायदेविषयक, तंत्रज्ञान, प्रबोधनात्मक विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.अशी माहिती परिषदेचे संघटक डॉ.अशोक जाधव यांनी दिली.
तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘नारीशक्ती आणि देशभक्ती’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. असे वुमन्स डॉक्टर विंगच्या कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. नीता नरके यांनी सांगितले.पत्रकार परिषदेस परिषदेच्या संघटक सचिव डॉ.गीता पिल्लई,डॉ. विद्युत शहा,सह सचिव डॉ. ए. बी.पाटील,डॉ.उन्नती सबनीस, डॉ. अरुण धुमाळे,डॉ.राजेंद्र वायचळ, डॉ.देवेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments