डॉ. देशमुख व पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांचा सन्मान
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात काळे धंदे मोडून काढून संघटीत गुन्हेगारांचेवर मोकांतर्गत कारवाई करून सात राज्यातील मटका मोडीत काढलेले मावळते पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना सन्मानीत केले.
तसेच राजस्थान राज्यात जवळपास 32 गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे व राजस्थान सहित बाजूच्या राज्यात दहशत पसरवून राजस्थान पोलिसांना खुल्ले आव्हान देणारे कुख्यात गँगस्टर ” 007 बिष्णोई” गँगचा गँग लिडर श्यामलाल पुनिया व त्याच्या इतर दोन साथीदाराने किणी टोल नाका येथे पोलिसांवर केलेल्या फायरिंग दरम्यान पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी गजबजलेल्या ठिकाणी आबालवृद्ध प्रवाशांची व आपल्या सहकाऱ्यांचे तसेच स्वताचे प्राण वाचविण्यासाठी प्रतिउत्तरा दाखल केलेल्या फायरिंमध्ये गँग लिडर श्यामलाल पुनिया व त्याच्या साथीदारास जखमी करून जेरबंद केले.या कामगिरीनिमित्त पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांनी पोलीस दलात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना “सन्मान खा की वर्दीचा ” हा कार्यक्रम आयोजीत २० सप्टेंबर २०२० रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी माजी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास उर्वरीत महावैज्ञानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापिक संपादक दैनिक पुढारी मा.योगेश जाधव साहेब ,एबीपी माझा मुख्य संपादक मा.राजीव खांडेकर साहेब,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे
मा.किरण जोशी व इतर मान्यवारांची उपस्थिती होती.