कोल्हापूर ता.22 :- कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने मध्यवर्ती बसस्थानकासमोरील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळयास महापौर सौ.निलोफर आजरेकर व उपमहापौर संजय मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, कनिष्ठ अभियंता मिरा नागिमे, दिलीप पोवार, रा.छ.शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरेश साळूंखे, उपप्राचार्य राजाराम डुबल, नंदिनी साळुंखे, प्राचार्य संजय साठे, विलास किल्लेदार, सुरेश पाटील, मिलींद पाटील, समाधान पवार, जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूर अध्यक्ष प्रदिप घाटगे, कर्मचार व नागरिक संख्येने उपस्थित होते.