कोल्हापूर ता. 22 : येथील विद्यापीठ हायस्कूलच्या 1993 च्या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा स्मशानभूमी अंत्यसंस्कारासाठी आज 10 हजार शेणी उपमहापौर संजय मोहिते च्यांच्या उपस्थितीत पंचगंगा स्मशानभूमिस दान केल्या.यावेळी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, चेतन चव्हाण, सुमंत कुलकर्णी, महेश पाटील, अमर माने, विश्वनाथ तेली, शरद कोथळकर, आरोग्य निरिक्षक अरविंद कांबळे, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यापूर्वी वीस हजार व आज दहा हजार एकूण तीस हजार शेणी या बॅचने पंचगंगा स्मशानभूमिस दिल्या असल्याचे नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी सांगितले. आज दिलेल्या या दहा हजार शेणी कसबा बावडा स्मशानभूमीसाठी रवाना करण्यात आल्या.