कोल्हापूर ता. 21 : येथील पंचगंगा नागरी सहकारी बँकेच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमिस 11 हजार शेणी बॅकेचे अध्यक्ष राजाराम शिपुगडे यांनी महापालिकेचे आरोग्य निरिक्षक अरविंद कांबळे यांच्याकडे सुपूर्द केल्या.यावेळी चेअरमन राजाराम शिपुगडे यांच्यासह उपाध्यक्ष राहूल भोसले, संचालक संदिप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक फडणीस, सरव्यवस्थापक सुशिल कुलकर्णी, मार्केटींग मॅनेजर दिपक गाणू आणि सुभाष बोधे आदिजण उपस्थित होते.