केआयटीमध्ये ‘इमर्सिव्ह व्हर्चुअल रिआलिटी’ विषयावरील कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील अभियांत्रिकी शिक्षणातील अग्रगण्य संस्था के. आय. टी. येथे संगणक अभियांत्रिकी विभागामार्फत ए.आय.सी.टी.ई. अटल (AICTE ATAL )या उपक्रमा अंतर्गत ‘इमर्सिव्ह व्ही. आर’ या विषयावर ५ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदरची कार्यशाळा दि. १४ ते १८ सप्टेंबर२०२१ दरम्यान ऑनलाईन माध्यमातून पार पडली.
के. आय. टी. महाविदयालय नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात नेहमीच अग्रेसर असते. महाविदयालयात संगणकशास्त्र अभियांत्रिकी विभागाने नुकतीच अद्ययावत उपकरणांनी सज्ज अशी ए. आर. व्ही. आर. प्रयोगशाळेची उभारणी केली आहे, जीचा उपयोग करुन परिसरातील विदयार्थी ए. आर. व्ही. आर.टेक्नॉलाजीमध्ये करीयर करु शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठीही होणार आहे. त्यासाठीच या लॅबमध्ये विदयार्थी तसेच शिक्षकांसाठी वगवेगळे उपक्रम, कार्यशाळा व कोर्सेसचे आयोजन होत असते. याचाच एक भाग म्हणून ए.आय.सी.टी.ई. अटल (AICTE ATAL ) अतर्गत कार्यशाळेसाठी प्रस्ताव देण्यात आला होता. सर्व तांत्रिक बाबी लक्षात घेवून ए.आय.सी.टी.ई.ने प्रस्तावित कार्यशाळेच्या आयोजनाचा मान के.आय.टी. महाविदयालयाला दिला आहे.
कार्यशाळेचे आयोजन संगणकशास्त्र विभागाने केले होते. संयोजनाची धुरा संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. ममता कलस यांनी पाहिली ए. आर. व्ही. आर. लॅब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साकारली गेली असे के. आय.टी. चे विश्वस्त कर्नल प्रतापसिंह रावराणे यांनी कार्यशाळेच्या प्रथम दोन सत्रात सहभागी शिक्षकांना ए. आर. व्ही. आर. तंत्रज्ञानाच्या व्याप्ती आणि प्राप्त संधी याबद्दल मार्गदर्शन केले प्रा. दिपक महाजन यांनी युनिटी या गेम इंजिनचा वापर करुन गेम डेव्हलपमेंटचे प्रात्यक्षिक घेतले प्रा. संदीप राबाडे यांनी ब्लेंडर या सॉफ्टवेअरचे प्रात्यक्षिक दाखवून ए. आर. अॅप डेव्हलप करवून घेतले.
इतर विविध सत्रात प्रा. रजनी कामत, सहयोगी प्राध्यापक, सायबर कोल्हापूर व श्री.अजय पार्गे, सी.ई.ओ डिजिटल आर्ट इंडिया लिमिटेड यांचे मार्गदर्शन सर्व सहभागी प्राध्यापकांना मिळाले. अवनी साबडे, फर्स्ट इंडियन वुमन रग्बी कॅप्टन यांनी खेळ आणि ए. आर. व्ही. आर. तंत्रज्ञान वापरुन खेळाडूंना मिळणाऱ्या नव्या प्रशिक्षणावर प्रकाश टाकला. डी. बी. प्रॉडक्शनचे सी. ई. ओ श्री. वेंकट यांनी व्ही. आर. च्या विविध प्रयोगांची माहिती दिली. कार्यशाळेत देशभरातील १२६ प्राध्यापकांनी सहभाग घेतला. अशा प्रकारचे ए. आर. व्ही. आर. व इमर्सिव्ह व्ही.आर. या तंत्रज्ञानावर आधारित प्रयोगशाळा हि पश्चिम महाराष्ट्रात पहिलीच ठरली आहे.
या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाला ए. आय. सी. टी. ई. कडून फंडिंग मिळाले आहे. सदर कार्यशाळेचा प्रस्ताव संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. ममता कलस यांनी तयार केला व फंडिंग मिळविले. कार्यशाळेच्या उद्घाटनात संस्थेचे अध्यक्ष, श्री सुनील कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत सहभागी प्राध्यापकांनी प्रशिक्षण व आयोजनाबद्दल अतिशय उत्कृष्ट अभिप्राय दिला. संस्थेचे सचिव, श्री दिपक चौगुले यांनी कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनाबद्दल अभिनंदन केले.
या कार्यशाळेसाठी के.आय.टी चे अध्यक्ष, श्री. सुनिल कुलकर्णी उपाध्यक्ष, श्री. साजीद हुदली सचिव, श्री. दीपक चौगुले तसेच महाविदयालयाचे प्रभारी संचालक डॉ. एम. एम. मुजुमदार यांचे प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनय प्रभावळकर, प्रा. पूजा पाटील व प्रा.शर्वली सरनाईक यांनी केले. भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा के. आय. टी. चा मानस आहे.