राजर्षी शाहू सेंटरचे रविवारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व नामदार राजेश टोपे यांच्या हस्ते उदघाटन होणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील प्रसिद्ध असणारी राजर्षी शाहू ब्लड बँकचे रुपांतर सेंटरमध्ये झाले आहे या सेंटरचे येत्या रविवारी १६ जुलै रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व नामदार राजेश टोपे यांच्या हस्ते होणार आहे.श्रीमंत छत्रपती यावेळी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील सेक्रेटरी महेंद्र परमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राजर्षी शाहू ब्लड बँकेचे केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार बँकेचा उल्लेख आता ब्लड सेंटर असा करावा लागणार आहे त्यामुळे आता ही बँक राजर्षी शाहू ब्लड सेंटर या नावाने संबोधले जाणार आहे असे यावेळी सांगण्यात आले यावेळी उदघाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील ग्रामविकास आणि कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफ आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमांमध्ये कोरोना महामारी काळात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री नामदार राजेश टोपे यांचा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते नागरी सत्कार केला जाणार आहे येथे शुक्रवारी १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता राजर्षी शाहू ब्लड सेंटर रोटरी समाज सेवा केंद्र कैलास वासी माधव प्रसाद गोइंका भवन जिल्हाधिकारी कार्यालय रोड नागाळा पार्क येथे हा कार्यक्रम होणार आहे सध्या या सेंटरचे यशस्वी वाटचाल सुरु असून त्यामध्ये सेवा केंद्र इंडियन रेड क्रॉस सोसायटी शेतकरी सहकारी संघ व माजी पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभत आहे ही बँक सामाजिक संस्थेमार्फत समाजासाठी चालवली जाणारी ब्लड बँक असून त्याचा उद्देश समाजाची सेवा करणे हाच आहे असे यावेळी सेक्रेटरी महेंद्र परमार यांनी सांगितले यावेळी पत्रकार परिषदेला डॉ.अक्षता पवार, संजय नलावडे यांच्यासह सेंटरचे कर्मचारी उपस्थित होते.