Friday, July 19, 2024
Home ताज्या पोदार लर्न स्कूल शैक्षणिक फ्रँचायजी मॉडेल माध्यमातून ग्रामीण भारतातील शैक्षणिक उद्योजकांच्या उद्दिष्टांना...

पोदार लर्न स्कूल शैक्षणिक फ्रँचायजी मॉडेल माध्यमातून ग्रामीण भारतातील शैक्षणिक उद्योजकांच्या उद्दिष्टांना पाठबळ

पोदार लर्न स्कूल शैक्षणिक फ्रँचायजी मॉडेल माध्यमातून ग्रामीण भारतातील शैक्षणिक उद्योजकांच्या उद्दिष्टांना पाठबळ

मुंबई/प्रतिनिधी : पोदार लर्न स्कूल (पीएलएस) ही भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक फ्रँचायझी आपल्या फ्रँचायझीवर आधारित प्रारूपाच्या माध्यमातून ग्रामीण भारतातील शैक्षणिक उद्योजकांच्या दृष्टीकोनाला सहाय्य करून शैक्षणिक फ्रँचायझी क्षेत्राचे नेतृत्व करत आहे. एकूण ३६ निमशहरी आणि ग्रामीण उद्योजकांनी या किफायतशीर संधीचा लाभ घेतला आहे.. देशभरात सीबीएसई/आयसीएसई शाळा स्थापन करण्यासपीएलएस संपूर्ण सहाय्य पुरवत आहे.
पोदार लर्न स्कूलमागील कल्पना शिक्षणाप्रती कळकळ असलेल्या व समाजाचे देणे फेडण्यासाठी उत्सुक अशा प्रेरित व पात्र व्यक्ती घडवणे ही आहे. पोदार लर्न स्कूल त्यांना या कळकळीचे रूपांतर उद्योगात करण्यासाठी आवश्यक अशी आर्थिकदृष्ट्या आकर्षक व्यवसाय विधाने पुरवते. यवतमाळमधील विद्यालंकार्स पीएलएस, लातूरमधील पोस्टे पोदार लर्न स्कूर आणि बीडमधील राजस्थानीज पोदार लर्न स्कूल ही या फ्रँचायझी आधारित मॉडेलची अनेक यशस्वी उदाहरणे आहेत.
पोदार एज्युकेशन नेटवर्कचे संचालक श्री. हर्ष पोदार म्हणाले, “पोदार लर्न स्कूल फ्रँचायझी संकल्पनेला मिळालेला उदंड प्रतिसाद खूपच सुखावणारा आहे. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता, प्रशिक्षित शिक्षक आणि चांगल्या संरचनेचीवानवा भासते. निमशहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळवून देऊन पोदार लर्न स्कूल सामाजिक उद्योजकता व रोजगारासाठी वाढीच्या संधी निर्माण करत आहे. निमशहरी व ग्रामीण भागातील उद्योजक पोदार एज्युकेशन नेटवर्कशी भागीदारी करून हे लाभ उपलब्ध करून घेऊ शकतात. पोदार एज्युकेशन नेटवर्क ही विविध भागांमध्ये तशाच शाळा स्थापन करण्यात मदत करणारी सुस्थापित व अनुभवी संस्था आहे. आम्ही उद्योजकांना त्यांच्या स्वप्नातील शाळा बांधण्यात मदत करत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे.”
श्री. पोदार पुढे म्हणाले, “प्रबळ आर्थिक समीकरण हा कोणत्याही यशस्वी व्यवसाय प्रारूपाचा गाभा असतो. फ्रँचायझीवर आधारित प्रारूपाचा लाभ फ्रँचायझर व फ्रँचायझी दोहोंना मिळाला पाहिजे आणि फ्रँचायझींसाठी हे प्रारूप विशेष किफायतशीर असले पाहिजे, जेणेकरून व्यवसायाचा प्रसार होईल आणि संपूर्ण निमशहरी व ग्रामीण भागात तो भक्कमपणे उभा राहू शकेल. हे प्रारूप आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असेल तर त्यातून ग्रामीण व निमशहरी उद्योजकांची बीजे पेरली जातील आणि याचा अप्रत्यक्ष परिणाम देशभरातील रोजगार, उत्पन्न व आर्थिक वाढीवर होईल.”
शाळा स्थापन करण्यासाठी व चालवण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यावर निधी, पायाभूत सुविधा स्थापित करणे आणि देखभाल करणे, आर्थिक नियोजन तसेच कामकाज व मार्केटिंग तंत्रांचे माहिती असणे आवश्यक आहे. पोदार लर्न स्कूल फ्रँचायझींना ब्रॅण्डिंग, दर्जा नियंत्रण व सातत्य तसेच एकंदर शाश्वततेसाठी सहाय्य करते. उत्तम काम करण्यासाठी असलेली अनेकविध घटकांची आवश्यकता बघता, संस्था फ्रँचायझी शाळांना सर्वांगीण सहाय्य पुरवते.
यात छोट्या शहरांना अनेक स्तरांवर लाभ मिळतात त्यामुळे दोन्ही बाजूंसाठी ही लाभदायक परिस्थिती आहे. केवळ शिक्षकांसाठीच नव्हे, तर शाळा प्रशासन कर्मचारी, बसचालक, शाळेसाठी स्टेशनरी पुरवणारे व अन्य पूरक व्यावसायिकांसाठी यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतात. निमशहरी/ग्रामीण गावांमध्ये स्थायिक होण्यासाठी पात्रताधारक शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांनी आकर्षण निर्माण झाले आहे. सर्व स्तर व समुदायांतील विद्यार्थ्यांना आता त्यांच्या गावात चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध होत आहे. त्यासाठी त्यांना गाव सोडून शहरात जाण्याची गरज भासत नाही. विद्यार्थ्यांच्या निवडीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद केला जात नाही.‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर शाळेत प्रवेश केले जातात.
पोदार लर्न स्कूलने ग्रामीण भागावर प्रभाव टाकला आहे यात वाद नाही. कारण, यामुळे विद्यार्थ्यांना चांगले व विस्तारित शैक्षणिक वातावरण मिळून अनेक लाभ मिळत आहेतच, शिवाय अनेक संधींच्या माध्यमातून रोजगार संधी प्राप्त झाली आहेत. देशात समृद्धी आणण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास तेवढाच महत्त्वाचा आहे हे सत्य पोदार लर्न स्कूलला समजले आहे. जेणेकरून प्रत्येक मुलास समान वागणूक दिली जावी आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता चांगले शिक्षण मिळू शकेल या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments