Thursday, November 21, 2024
Home ग्लोबल मुरगूडच्या जनतेला पाणी -पाणी करायला लावणार्यानी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिवशी राधानगरी धरणाची...

मुरगूडच्या जनतेला पाणी -पाणी करायला लावणार्यानी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिवशी राधानगरी धरणाची भूमी कलंकित करू नये

मुरगूडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पत्रक……*
*मुरगुड, दि.२४:*
*मुरगूडच्या जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी -पाणी करायला लावणाऱ्यानी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिवशी राधानगरीची भूमी कलंकित करू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुरगुड शहरातील कार्यकर्त्यांनी दिला आहे. एकीकडे राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेल्या या तलावातून जनतेला पिण्यासाठी पाणी देत नाहीत आणि दुसरीकडे राधानगरी धरणाच्या भूमीत शाहू महाराज जयंती साजरी करण्याची भाषा बोलतात. ही दुटप्पी भूमिका का? असा सवाल या पत्रकात विचारला आहे.
या पत्रकावर माजी नगराध्यक्ष प्रकाश चौगुले, नगरसेवक रविराज परीट, राष्ट्रवादीचे मुरगूड शहराध्यक्ष रणजीत सूर्यवंशी, डॉ. सुनील चौगुले, कॉम्रेड अशोक चौगुले, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य राजू आमते, माजी नगरसेवक नामदेव भांदीगरे, संजय मोरबाळे, जगन्नाथ पुजारी, अमित तोरसे, प्रणव उर्फ विकी बोरगावे, नंदकिशोर खराडे, किरण चौगुले, समाधान चौगुले आदी प्रमुखांच्या सह्या आहेत.*
*प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, राजर्षि शाहू महाराजांची जयंती शनिवार दि. २६ जून २०२१ रोजी आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानाच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलावा म्हणून हरितक्रांतीचे स्वप्न पाहिले. फक्त स्वप्न पाहिलेच नाही तर स्वतःचा खजिना त्यांनी जनतेसाठी रिकामा केला व राधानगरी धरणाची पूर्तता केली. अशा महापुरुषाची जयंती काही लोक या धरणावर जाऊन साजरी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या गोष्टीसाठी आम्हा मुरगूडकरांचा ठाम विरोध आहे.
      कारण, छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज मुरगुडकरांना उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पाणी -पाणी करावयास लावत आहेत. बाब शोभनीय नाही. छत्रपती राजर्षी शाहू महाराज व श्रीमंत बापूसाहेब महाराज यांनी मुरगुड व परिसरातील लोकांच्या सहकार्याने तलाव बांधला व पाण्याची चावी थेट तलावांमधून सायफनने मुरगुडच्या हुतात्मा चौकात आणून जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचा लोकार्पण कार्यक्रम केला. हा तलाव मुरगूडकर जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठीच आहे. असे असताना शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज म्हणून घेणारे मात्र आपल्या उसासाठी पाण्याचा प्रचंड वापर करून, जनतेला मात्र पिण्यासाठी पाणी न देता त्यांना दाहीदिशा पाणी -पाणी करावयास लावत आहेत.
*”राजर्षी शाहू महाराज हयात असते तर……..”*
*अशा परिस्थितीत छत्रपती शाहू महाराज हयात असते तर त्यांनी नदीवरून उसासाठी वेगळी पाण्याची योजना आणली असती.  मुरगूडचा तलाव जनतेच्या मालकीचा केला असता. म्हणून अशा व्यक्तींनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीला राधानगरी धरणाची पवित्र भूमी कलंकित करू नये.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments