Monday, December 30, 2024
Home ताज्या शिवाजी विद्यापीठाच्या डीओटी कोविड केअर सेंटरला आम्ही कोल्हापूरी व्हाट्सअप ग्रुप कडून २५...

शिवाजी विद्यापीठाच्या डीओटी कोविड केअर सेंटरला आम्ही कोल्हापूरी व्हाट्सअप ग्रुप कडून २५ गाद्यांची मदत

शिवाजी विद्यापीठाच्या डीओटी कोविड केअर सेंटरला आम्ही कोल्हापूरी व्हाट्सअप ग्रुप कडून २५ गाद्यांची मदत

कोल्हापूर/प्रतिनिधी : व्हाट्सअपचा आम्ही कोल्हापूरी ग्रुप आपत्तीच्या काळात नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करत आला आहे.व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा समाजातील गरजूंना मोलाची मदत करणे शक्य आहे हे या ग्रुपने सोशल मीडियाची सुरवात झाली त्याचवेळी दाखवून दिले आहे.सद्या वाढलेल्या कोविड संक्रमण काळात शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात सुरू करण्यात आलेल्या डीओटी कोविड केअर सेंटर मध्ये लक्षणं कमी असणाऱ्या कोविड रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या २५ गाद्या याच आम्ही कोल्हापुरी ग्रुपने आज सेंटर प्रमुख डॉ.पावरा यांच्याकडे सुपूर्द करून पुन्हा एकदा आपली समाजाशी असणारी बांधिलकीची वीण घट्ट केली.
आम्ही कोल्हापुरी ग्रुपचे ऍडमिन नवेज मुल्ला आणि सदस्य आशपाक आजरेकर यांनी नुकतीच शिवाजी विद्यापीठाच्या डीओटी कोविड केअर सेंटरला भेट देऊन इथल्या कामकाजाबद्दल जाणून घेतले होते.यावेळी इथे रुग्णांना स्वतःचे अंथरूण घेऊन यावे लागत असल्याचे निदर्शनास आल्याने या कोविड सेंटरला रुग्णांसाठी गाद्या उपलब्ध करून देण्याचा चंग नवेज मुल्ला आणि आशपाक आजरेकर यांनी बांधला.परंतु यासाठी १५ हजार रुपये खर्च होता.त्यामूळे आम्ही कोल्हापुरी ग्रुपवर एक संदेश शेअर करण्यात आला आणि अवघ्या दोन दिवसात यातील काही सदस्यांनी १५ हजार रुपये जमा केले.आणि आज तात्काळ २५ गाद्या डीओटी कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन सुपूर्द केल्या.
यावेळी ग्रुप ऍडमीन नवेज मुल्ला,मिलिंद धोंड आशपाक आजरेकर, प्राचार्य डॉ.महादेव नरके,शाहीर आझाद नायकवडी यांच्यासह अन्य काही सदस्य सुद्धा उपस्थित होते.सोशल मीडियावर फेसबुक आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून नको त्या अफवा आणि चर्चा झडत असतात.मनात भीती आणि संभ्रम निर्माण करणारे संदेश व्हायरल केले जातात.गरज नसताना गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे संदेश शेअर करून आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन इनबॉक्स तुडूंब भरून जातो त्याऐवजी
आम्ही कोल्हापुरी या व्हाट्सअप ग्रुपप्रमाणे प्रत्येक व्हाट्स अप ग्रुपने आपली जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न केल्यास कोरोनाच्या या जीवघेण्या संक्रमण काळात तसेच कोल्हापूरवर ओढवणाऱ्या आपत्तीवर जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांना सुद्धा नक्कीच हातभार तर लागेलच पण सामाजिक कार्य केल्याचे समाधान लाभणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन

तपोवन मैदानावर दि. २७ ते ३० डिसेंबर २०२४ चार दिवस सतेज कृषी प्रदर्शन सतेज कृषी प्रदर्शनास सुरुवात,३० डिसेंबर पर्यंत चालणार प्रदर्शन कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली...

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

Recent Comments