गडहिंग्लजचे स्वराज्य मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सेवा केंद्र बनेल – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास
१०० बेडचे अद्ययावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जनतेच्या सेवेत
केडीसीसी बँकेच्या अर्थसहाय्यातून उभारले सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
गडहिग्लज/प्रतिनिधी : गडहिंग्लज येथील डॉ. अजित पाटोळे यांचे स्वराज्य णमल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल शहरासह या भागाचे सेवा केंद्र बनेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
संकेश्वर रोडवरील नेहरूनगरात नव्यानेच बांधलेल्या सुराज्य मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या कोरोना कक्षाचे लोकार्पण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. हॉस्पिटलच्यावतीने डॉ. पाटोळे यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सुराज्य मल्टीस्पेशालिटी या हॉस्पिटलचे डॉ. अजित पाटोळे यांनी केलेली ही यशस्वी वाटचाल कौतुकास्पद आहे. त्यांच्या जिद्दीला आणि कष्टाला पाठबळ देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी साडेचार कोटी रुपये अर्थपुरवठा केला आहे. अशाप्रकारे बँकेने स्थापनेपासून पहिल्यांदाच हॉस्पिटल उभारण्यासाठी अर्थपुरवठा केला आहे. बहुजन समाजातून आलेल्या डॉ. अजित पाटोळे यांच्यासारख्या कष्टाळू व तळमळीच्या एका डॉक्टरला उभे करण्यासाठीच आपली ही सगळी धडपड असल्याचेही ते म्हणाले.
चौकट…
मंत्री श्री. मुश्रीफ व केडीसीसी बँकेप्रती कृतज्ञता.
डॉ. अजित पाटोळे म्हणाले, सगळ्याच आरोग्य सुविधा एकाच छताखाली देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तो पूर्णत्वाला नेण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. एकूण सात कोटी खर्चापैकी तब्बल साडेचार ते पाच कोटींचा पतपुरवठा केडीसीसी बँकेने केला आहे.यावेळी प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नागेंद्र मुतकेकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.