Thursday, July 18, 2024
Home ताज्या कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी महानगरपालिकेला  आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून २३ लाखाचा निधी

कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी महानगरपालिकेला  आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून २३ लाखाचा निधी

कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी महानगरपालिकेला  आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून २३ लाखाचा निधी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेस कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी २३ लाख रूपयांचा निधी आज दिला. भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधत, निधीचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे आमदार चंद्रकांत जाधव यांनी सूपूर्द केले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे आदी उपस्थित होते.
राज्य शासनाने खास बाब म्हणून आमदार निधी अर्थात स्थानिक विकास निधीतून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक यंत्रसामुग्री व साहित्य खरेदिसाठी एक कोटी रूपये खर्च करण्यास सहमती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयासाठी (सीपीआर) वैद्यकिय यंत्रसामग्री व साहित्यासाठी ४० लाख ५० हजार रुपयांचा निधी दिला आहे, तर कोल्हापूर महापनगरपालिकेस ३६ लाख रुपयांचा निधी दिला आहे.
कोरोनाच्या काळात कार्डियाक रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गंभीर रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. त्यातही यातील गंभीर रुग्णांना फुफ्फुस तसेच हृदयाशी संबंधित आजार असतात. त्यामुळे व्हेंटिलेटर व ऑक्सिजन आदी अद्ययावत सुविधा असलेली ‘कार्डियाक’ रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक असते ; मात्र, कोल्हापूर महानगरपालिकेकडे अशी एकही रुग्णवाहिका नाही. त्यामुळे अशा रूग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे औषधे, ईसीजी, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, सीरिज पंप यांसारख्या सुविधाने परिपूर्ण असलेली कार्डियाक रुग्णवाहिका कोल्हापूर महानगरपालिकेकडे असावी, असा मानस आमदार जाधव यांनी व्यक्त केला. यानुसार आमदार जाधव यांनी आज कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी महानगरपालिकेला २३ लाख रूपयांचा निधी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments