Thursday, December 26, 2024
Home ताज्या कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती १०९८ क्रमांकावर कळवा -  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत...

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती १०९८ क्रमांकावर कळवा –  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी जिल्हास्तरावर टास्क फोर्स स्थापन

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती १०९८ क्रमांकावर कळवा –  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
जिल्हास्तरावर टास्क फोर्स स्थापन

सांगली दि. २१ (जि.मा.का.) :कोविड-१९ आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबत विहीत प्रपत्र तयार करून, अशा बालकांची माहिती प्राप्त करून महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे तातडीने द्यावी. कोविड-१९ आजाराकरिता रूग्णालयात दाखल होतेवेळी बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा ही माहिती रूग्णांकडून भरून घेण्यात यावी. अशा प्रकारच्या मुलांची माहिती बालकांचे शुभचिंतक या दृष्टीने चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ व बाल कल्याण समिती सांगली यांना संपर्क करून कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाची (टास्क फोर्स) बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सींगव्दारे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विश्वास माने, महानगरपालिका उपायुक्त राहूल रोकडे, बाल कल्याण समिती अध्यक्षा सुचेता मलवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बी. टी. नागरगोजे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे एस. एच. बेंद्रे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड-१९ प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आले आहे. कोरोनामुळे जीव गमवलेल्या पैकी अनेक व्यक्तींची मुले १८ वर्षाखालील असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीत मुलांचे संगोपण व संरक्षण होणे खूप गरजेचे आहे.
चाईल्ड हेल्पलाईन १०९८ बाबतचा माहिती फलक सर्व रूग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावे. कोविड-१९ आजाराने पालक गमावलेल्या बालकांना इतर नातेवाईक सांभाळण्यास तयार आहेत किंवा कसे तसेच बालगृहात दाखल करणे आवश्यक आहे किंवा कसे याबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून योग्य ती कार्यवाही करावी. जिल्ह्यात कार्यरत निरीक्षणगृह / बालगृहांना नियमित भेटी देवून सर्व प्रवेशितांची नियमित वैद्यकीय तपासणी होत आहे का याची माहिती घ्यावी. बालकांच्या आरोग्याबाबत दैनंदिन आढावा घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
कोरोनामुळे मृत झालेल्या पालकांच्या बालकांना मदत करण्यासाठी शासनाने चाईल्ड हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. या नंबरवर बालकांची माहिती वेळेत प्राप्त झाल्यास त्यांची काळजी व संरक्षणासंबंधी पुढील कार्यवाही करणे शक्य होणार आहे. चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ तसेच आयुक्त महिला व बाल विकास विभाग पुणे८३०८९९२२२२,७४०००१५५१८ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ०२३३-२६०००४३ अध्यक्ष बाल कल्याण समिती सांगली ९८९०८३७२८४ जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (समन्वयक) ७९७२२१४२३६/९५५२३१०३९३आदि हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे एस. एच. बेंद्रे  यानी जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या कृती दलाची सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राम बाल संरक्षण समिती मधील अंगणवाडी सेविका यांच्या सहाय्याने बालकांच्या पालकांना संपर्क साधून आवश्यक मदत पुरविण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम

प्रिमियम ब्रिक्सटन बाइक्स आणि व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत मोटोहॉसने कोल्हापुरात सुरू केली आपले दुसरे डीलरशिप शोरूम   कोल्हापूर/प्रतिनिधी : मोटोहॉस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि....

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार

ओला इलेक्ट्रिकचा संपूर्ण देशभरात ४००० स्टोअर्सचा विस्तार कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील सर्वात मोठी प्युअर प्ले ईलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकने संपूर्ण भारतात ४,००० स्टोअरच्या...

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

Recent Comments