Thursday, December 5, 2024
Home ताज्या नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान        

नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान        

नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान
          
सीपीआरसह कोरोना दवाखान्याना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप

          
कोल्हापूर/प्रतिनिधी : नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स आरोग्य विभागाला प्रदान करण्यात आले. सीपीआरसह जिल्ह्यातील कोरोना दवाखान्यांना द्यावयाच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात ही मशीन्स सीपीआर प्रशासनाला प्रदान करण्यात आली.
यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या संघर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना अन्नधान्यासह, औषध -पाणी व वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा सातत्याने सुरूच आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या ऑक्सिजन टंचाईवर आमच्या परीने पर्याय म्हणून सीपीआर -३०, गडगडहिग्लज  उपजिल्हा रुग्णालय -२०, कागल कोविड केअर सेंटर -२५, इचलकंजीचे आयजीएम रुग्णालय -२५,  मुरगूड केंद्र – पाच, उत्तुर प्राथमिक आरोग्य केंद्र -पाच याप्रमाणे ही मशीन्स देण्यात येणार आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी म्हणाले, ऑक्सिजनच्या या आणीबाणीच्या काळात  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन स्मुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस.  मोरे म्हणाले, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मनीमाऊची   उपचारांमध्ये चांगली मदत होईल.यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, प्रदेश सरचिटणीस राजेश लाटकर, प्रदेश युवक सरचिटणीस आदिल फरास, बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, दिनकरराव कोतेकर, राजेंद्र सुतार, अजिंक्य पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments