गोकुळ मध्ये अखेर सत्तांतर,महाडिक गटाचे वर्चस्व संपुष्टात
कोल्हापूर/(श्रद्धा जोगळेकर) :
गोकुळ मध्ये अखेर निवडणुकीतूनच सत्तांतर करण्यात आले आहे आणि गेली ३० वर्षे गोकुळमध्ये अस्तित्व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांना यश मिळाले आहे गेली ३० वर्षे या गोकुळ दूध संघावर माजी आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार पी.एन. पाटील यांची सत्ता होती गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही ही सत्ता संपुष्टात येत नव्हती आता मात्र ही सत्ता विरोधी राजर्षि शाहू शेतकरी आघाडीने संपुष्टात आनली आहे. गेल्या दिड तापाची माजी आमदार महादेवराव महाडिक , विघमान आमदार पी .एन. पाटील सह अरुण नरके यांची सत्ता रोखण्यात अखेर पालकमंत्री सतेज पाटील यांना यश लाभले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय आणि सहकार विश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अथक गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत अखेर पालकमंत्री सतेज पाटील यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह शिवसेना खासदार प्रा.संजय मंडलिक, आमदार प्रकाश आंबिटकर, चंद्रदीप नरकेसह , ज्येष्ठ विद्यमान संचालकांच्या आबाजी पाटील यांच्या बरोबरीने महायुतीची यशस्वी ठरलेली मोट बांधली.आणि गेली ३० वर्षे असलेली महादेवराव महाडिक आणि आमदार पी एन पाटील यांची सत्ता हस्तगत करत घवघवीत यश मिळवले. जिल्ह्यातील मोठी आर्थिक सत्ता असलेल्या सहकाराच्या क्षेत्रात मोठा धबधबा असलेल्या गोकुळची सत्ता काबीज करून सतेज पाटील यांनी गेल्या दीड वर्षापासून घेतलेल्या परिश्रमाचे कुशल संघटनात्मक बांधणी अखेर हे यश आले आहे या यशामुळे सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर कणखरपणे शिक्कामोर्तब झाले . आमचं ठरलय आता गोकुळच ऊरलयं हे त्यानी अखेर वास्तवात आणले आहे.
अंगावर सतीश पाटील यांनी तब्बल १७ उमेदवार निवडून आणले व ही सत्ता काबीज केली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते महाराष्ट्र राज्य मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी आहे व त्यांची सत्ता आहे विरोधी पक्ष म्हणून सध्या भाजप राज्यांमध्ये वावरत आहे आणि याच भाजपचे धनंजय महाडिक व माजी आमदार अमल महाडीक कोल्हापूर मध्ये कामकाज पाहत आहेत.धनंजय महाडिक व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यातील राजकारण नेहमीच चर्चिले गेले आहे. खासदारकीचा निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी मनात नसतानाही केवळ पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टीने आपल्या कार्यकर्त्यांना स्वतः धनंजय महाडिक यांच्या प्रचारामध्ये उतरवले होते आणि त्यांना निवडूनही आणले होते मात्र याची जाणीव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये धनंजय महाडिक यांनी न ठेवता भाजपच्या उमेदवारांना त्यांनी साथ दिल्याने पुन्हा या वादाची ठिणगी पडली आणि परत परत राजकारण शिजले गेले आणि पुन्हा एकदा सतेज पाटील यांनी महाडिक परिवाराला राजकारणातून बाजूला करायचे हा चंग बांधला आणि त्या दृष्टीने त्यांनी ही गोकुळ दूध संघाची निवडणूक लढविली आणि या ठिकाणी सत्ता काबीज केली. सतेज पाटील व हसन मुश्रीफ हे दोघेही यशस्वी झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत मध्ये अखेर गोकुळ दूध संघावर आपली भाजी मारत सतेज पाटील यांनी आपले स्थान बळकट केले व सत्तारूढ आघाडीला तीस वर्षानंतर खाली खेचण्यात यश मिळविले त्यामुळे संपूर्ण राज्यभरात याचे कौतुक तर होत आहेच शिवाय कोल्हापूरमध्ये घडत असलेल्या राजकारणाचा अभ्यास करून इतरही ठिकाणी राजकारण केले जाते.व सगळीकडे याचे अनुकरणही केले जाते हेही तितकेच सत्य आहे.हा अभुतपुर्व संतातराचा निकाल ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांच्या सह पी एन पाटील अरुण नरके यांना अंतर्मुख करणारा असाच ठरला आहे.