ऑक्सिजन प्लांटसाठी इंजिनिअरींग व मेडिकल क्षेत्रातील माजी सैनिकांना माहिती पाठविण्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे आवाहन
कोल्हापूर/(जिमाका) केंद्र शासनाव्दारे प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभा करण्याची तयारी केली जात आहे. यासाठी माजी सैनिक प्रवर्गातील इंजिनिअरींग व मेडिकल क्षेत्रातील अनुभवी टेक्निशियन्सची यादी बनविण्यात येत आहे. इच्छुक असलेल्या इंजिनिअरींग व मेडिकल क्षेत्रातील माजी सैनिकांनी त्यांची सैन्य क्र, रँक, ट्रेड, नाव, युनिट/कोर, पत्ता, मोबाईल क्र., ईमेल आयडी इत्यादी माहीती ई मेलव्दारेzswo_kolhapur@maharashtra.gov.in किंवा resettle.dsw@maharashtra.gov.in या ईमेल आयडी वर तात्काळ पाठवावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. ऑक्सिजन प्लांट उभा करण्यासाठी अनुभवी टेक्निशियन्सची मोठया प्रमाणात आवश्यकता भासणार आहे. त्या अनुषंगाने केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याव्दारे यादी तयार झाल्यानंतर त्यामधील माजी सैनिकांशी थेट संपर्क साधला जाणार आहे, असेही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे.