गोकुळ दूध संघावर विजय जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादकांचा – सतेज पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : सन्मानीय कै.आनंदराव चुयेकर साहेबांनी जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या या महत्वपूर्ण निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या १७ उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी, महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच हा संघ जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हाती देण्यासाठी गेली ६ वर्ष संघर्ष करणाऱ्या सर्वांचेच मनापासून आभार किंगमेकर सतेज पाटील यांनी मानले. आज खऱ्या अर्थाने गोकुळ दूध संघ जिल्ह्यातील सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हाती गेला. जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या अपेक्षेप्रमाणे गोकुळ दूध संघ चालविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.असेही ते म्हणाले.