राधानगरीतील प्रगतशिल शेतकरी बबन दादा महाडिक यांचे आकस्मिक निधन
कोल्हापूर/प्रतिनिधी : माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुतणे आणि धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू तसेच राधानगरीतील प्रगतशिल शेतकरी बबन दादा महाडिक यांचे आकस्मिक निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६१ वर्षे होते. राधानगरी तालुक्यातील राजकीय – सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. शेतीमध्येही त्यांनी अनेक प्रयोग करून, एक प्रगतशिल आणि यशस्वी शेतकरी म्हणून कामगिरी बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.