Thursday, November 21, 2024
Home ताज्या कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाइन

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाइन

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाइन

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी हेल्पलाईन सेंटर ला भेट देऊन कामाच्या पद्धतीची माहिती घेतली व युवकच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले

कराड/प्रतिनिधी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बहुतांश नागरिकांना बसायला लागल्याने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अश्या परिस्थितीत युवक काँग्रेसने हेल्पलाईन ची मोहीम देशभर उघडली आहे. कोरोना महामारीमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यभर विभागवार तसेच जिल्हावार कोविड हेल्पलाईन सेंटर सुरु केले आहेत. असेच हेल्पलाईन सेंटर कराड येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली उभारले आहे. हे हेल्पलाईन सेंटर सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना मदत तर करत आहेतच त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील रुग्णांना सुद्धा बेड मिळविण्यासाठी मदत करत आहेत. आज या हेल्पलाईन सेंटर ला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली तसेच हेल्पलाईन सेंटर मध्ये कश्याप्रकारे काम सुरु आहे याची माहिती घेतली व मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, युवानेते इंद्रजीत चव्हाण, युवकचे अमित जाधव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. अनेक लोक कोरोनाने बाधित होत आहेत. अश्या परिस्थितीत बाधित रुग्ण व त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा यासाठी धावाधाव करीत आहेत. अश्या रुग्णांना मदत व्हावी त्यांना वेळेत उपचार सुरु व्हावेत यासाठी युवक काँग्रेसने देशभर हेल्पलाईन सेंटर सुरु केली आहेत. त्याच धरतीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सुद्धा राज्यात प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन सेंटर सुरु केलेली आहे. सातारा जिल्ह्यासाठी कराड येथून युवक काँग्रेसची हेल्पलाईन सेंटर झाली असून युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली या हेल्पलाईन सेंटर चे काम नियोजनपूर्वक चालले आहे. या हेल्पलाईन सेंटर मध्ये ज्यांचे मदतीसाठी फोन येत आहेत त्यांच्या रुग्णांची उपयुक्त पुरेशी माहिती घेतली जात आहे व त्यांना हवी असणारी योग्य ती मदत युवक काँग्रेसची टीम करत आहे.
तसेच याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले कि, कोरोना रुग्णांना मदत व्हावी या उद्देशाने प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विभागवार तसेच जिल्हावार कोविड हेल्पलाईन सेंटर सुरु केलेली आहे. या प्रत्येक हेल्पलाईन सेंटर मध्ये पूर्णवेळ स्वयंसेवक बसून कोरोना रूग्णांना मदत करीत आहेत. रेमडेसिव्हर इंजेक्शन, रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, दवाखान्यांनी दिलेली अतिरिक्त बिल कमी करणे, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून देणे या कार्यात युवक काँग्रेसचे पदाधिकारी व स्वयंसेवक राबत आहेत.या हेल्पलाईन सेंटर च्या माध्यमातून गेल्या पाच दिवसात १०० हुन अधिक रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध केले आहेत. तसेच रेमडेसिव्हर इंजेक्शन सुद्धा अनेकांना उपलब्ध केले आहेत. याचसोबत ज्यांना ज्यांना ऑक्सिजन मशीन ची गरज आहे अश्याना सुद्धा मशीन दिली जात आहे. युवक काँग्रेसच्या स्वंयसेवकांची नावे जाहिर केली असून हेल्पलाईन सेंटर ची टीम आरोग्य विभाग व डॉक्टर यांच्या संपर्कात असून प्रशासनाला अप्रत्यक्ष मदत करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments