दोन्ही आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत होत आहे गोकुळ दूध संघ निवडणुक
गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांच्या हातात जाणार – पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ निवडणुकीकडे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिले आहे आज ही निवडणूक होत आहे.या निवडणुकीस आज २ मे रोजी इर्ष्येने मतदानास सुरुवात झाली. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी पाचवाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. सत्तारूढ राजर्षी शाहू आघाडी तसेच विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी यांच्यामध्ये इर्ष्येने लढत होत असून दोन्ही बाजूकडून मतदान होत आहे. दोन्ही बाजूनी आपण आघाडी घेणार असे सूचीत केले आहे.शिवाय आज मतदान केंद्रावर आपली ताकद दोन्ही बाजूकडून दाखवली जात आहे. मतदारांकडून जोरदार घोषणाबाजी द्वारे मतदान केंद्राबाहेर वातावरण बदलून टाकण्यात आले आहे. दरम्यान या निवडणुकीत २ हजार २८० मतदार आमच्यासोबत आहेत आमचे संपूर्ण पॅनेल निवडून येईल व हा संघ व्यापाऱ्यांच्या हातातून निसटून शेतकऱ्यांच्या हातात येईल असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारुढ आघाडीकडून पांढऱ्या टोप्या पांढरा मास्क परिधान करण्यात आले होत्या तर विरोधी आघाडीकडून पिवळ्या टोप्या, पिवळे स्कार्फ, पिवळे मास्क, परिधान करून शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. यामुळे दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शनद्वारे मतदान केले जात असून ही लढत निश्चितच अस्तित्वाची ठरणार आहे. कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी गेल्या एक महिन्यापासून रणधुमाळी सुरु आहे. सतारूढ राजर्षी शाहू आघाडी विरूध्द राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत ही लढत होत आहेत. सतारूढ राजर्षी शाहू आघाडीचे नेतृत्व माजी आमदार महादेवराव महाडिक. आमदार पी. एन. पाटील. अरूण नरके .माजी खासदर धनंजय महाडीक. व अध्यक्ष रर्विद्र आपटे यांनी केले. तर विरोधी पँनेलसाठी पालकमंत्री सतेज पाटील कामगार मंत्री हसन मुश्रीफ. आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यद्रावकर,खा. संजय मंडलिक. आमदार विनय कोरे. माजी आ. चंद्रदिप नरके आदी नेत्यांनी केले आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही आघाड्यांच्या नेत्याकडून विजयाचा दावा केला जात असला तरी या निवडणुकीत कोण आघाडी घेईल हे ४ मे रोजी होत असलेल्या मतमीजणीतून समोर येणार आहे.