Tuesday, October 15, 2024
Home पुणे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास बॅंकेकडून शंभर कोटी कर्ज मंजूर -...

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास बॅंकेकडून शंभर कोटी कर्ज मंजूर – संजय पवार यांची माहिती

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास बॅंकेकडून शंभर कोटी कर्ज मंजूर – संजय पवार यांची माहिती

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास बॅंकेकडून शंभर कोटी कर्ज मंजूर झाले असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष यांनी सांगितले आहे.
मराठा समाजातील बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी व व्यवसाय असल्यास तो वाढवण्यासाठी या महामंडळाच्या वतीने तीन प्रकारच्या बिनव्याजी कर्ज योजना राबवण्यात येत आहेत. असेही पवार यांनी सांगितले आहे.
यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना , गट कर्ज व्याज परतावा योजना,गट प्रकल्प योजना यांचा समावेश आहे.
आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1308 लाभार्थ्यांनी याचा वैयक्तिक लाभ घेतला असून गट कर्जामध्ये 9 लोकांनी लाभ घेतला आहे. ह्या योजनेसाठी बॅंकेकडून 101,25,40,730/- रुपये कर्ज वाटप झाले असून व्याज परताव्याची एकुण रक्कम रुपये 5,47,54,792/- इतकी आहे.
अनेक बॅंकानी ह्या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. भविष्यामध्ये मराठा समाजातील तरुण-तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या व्यवसाय सुरु करण्यासाठी ह्या महामंडळाच्या लाभ घ्यावा व नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे धाडसाने बना.
ह्या योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे व्याज महामंडळाच्यावतीने दिले जाते. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1317 लाभार्थी असून महाराष्ट्रामध्ये 17,867 इतके लाभार्थी आहेत. या योजनेसाठी बॅंकेकडून 1094,46,42,398/- रुपये कर्ज वाटप झाले आहे.
मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, मा.बाळासाहेब थोरात, मा. अध्यक्ष नरेंद्र पाटील, मा. जिल्हाधिकारी, मा. व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, अग्रणी जिल्हा बॅंक प्रबंधक राहुल माने, सर्व अधिकरी, कर्मचारी व विषेशतः जिल्हा समन्वयक यांचे इथपर्यंत यशस्वी सहकार्य लाभले.
भविष्यात सुध्दा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिद्दीने काम करणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत-जास्त मराठा लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संजय पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments