Friday, September 13, 2024
Home ताज्या धोत्री गल्ली येथील दत्तकृपा हॉस्पिटल ला महापालिकेची कारणे दाखवा नोटीस

धोत्री गल्ली येथील दत्तकृपा हॉस्पिटल ला महापालिकेची कारणे दाखवा नोटीस

धोत्री गल्ली येथील दत्तकृपा हॉस्पिटल ला महापालिकेची कारणे दाखवा नोटीस

कोल्हापूर/प्रतिनिधी : रंकाळा स्टँड परिसरातील धोत्री गल्ली येथील दत्तकृपा हॉस्पिटलला महापालिकेने आज चुकीची माहिती दिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे याबाबत दोन दिवसात लेखी खुलासा करण्याचे आदेश प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत सदरच्या हॉस्पिटल मधील डॉक्टर यांनी महापालिका प्रशासक यांना रात्री १०.३० वाजता आपल्या हॉस्पिटलमध्ये सिलेंडर साठा शिल्लक असताना तो संपले चा फोन केला याबाबत प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी उपायुक्त निखील मोरे यांना तात्काळ सदर तक्रारी बाबत शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या याबाबत उपायुक्त निखील मोरे यांनी या हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पुरवठा दाराशी संपर्क साधला असता त्याने आज या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा केली असल्याचे सांगितले यानंतर उपायुक्त निखील मोरे सहायक आयुक्त संदीप घार्गे अग्निशमन विभागाचे मनीष रणभिसे यांनी तात्काळ सदर हॉस्पिटललारात्री ११.३० ला भेट दिली यावेळी त्यांना या हॉस्पिटलमध्ये सिलेंडरच्या दहा टाक्या भरले असल्याचे आढळून आले. हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजनच्या टाक्या शिल्लक असतानाही डॉक्टर यांनी रात्रि चुकीची व खोटी माहिती दिली त्यामुळे सदरच्या हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments