निलराजे पंडीत-बावडेकर यांच्यावतीने महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी १.२५ लाखांची औषधे
कोल्हापूर/प्रतिनिधी : महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरसाठी निलराजे पंडीत- बावडेकर यांनी १.२५ लाखाची औषधे दिली. सदरचे साहित्य महापालिकेच्या कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात श्रीपंत अमात्य बालविकास ट्रस्ट श्रीमंत माईसाहेब बावडेकर स्कूलचे व्हाईस प्रेसिडेंट निलराजे पंडीत-बावडेकर यांनी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे दिली. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी याबाबत कोल्हापूरातील उद्योगपती, सामाजिक संस्था व नागरीकांस महापालिकेस वस्तू स्वरुपात मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन निलराजे पंडीत-बावडेकर यांनी (Oxygen Masks – 300, Nasal Cannula- 300, Latex Exam Glovers-20 Box, Vitamin C Tablet-8000, Multi Vitamain Tablet-8000) इत्यादी साहित्य दिले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, निखील मोरे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक आदी उपस्थित होते.