कोल्हापूर /प्रतिनिधी : लाॅकडाऊन
च्या काळात रिक्षा चालकांना मोठा आर्थिक फटका बसला त्यानंतरही अद्याप प्रवासी संख्या ही घटली आहे सध्या रिक्षाचालक मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचा घरफाळा आणि पाणीबीले माफ करावीत या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज दसरा चौकात कोल्हापूर जिल्हा राष्ट्र प्रेमी रिक्षा संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.याबातचे निवेदन शिष्टमंडळातर्फे महापालिका प्रशासनास देण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमध्ये रिक्षाची ही चाके थांबली आणि हातावर पोट असणारे रिक्षा व्यवसायिक हतबल झाला.तर लाॅकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर रिक्षाची चाके पुन्हा एकदा रस्त्यावर धावू लागली. मात्र कोरोनामुळे रिक्षा व्यवसायावर मंदी आली असून रिक्षा चालकाला घर चालवणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने सध्याची परिस्थिती लक्षात घेता रिक्षा चालकांचा घरफाळा आणि पाणीबीले माफ करावीत या प्रमुख मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा राष्ट्र प्रेमी रिक्षा संघटनेच्या वतीने दसरा चौकात निदर्शने करण्यात आली.यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतंर्गत रिक्षा चालकांना विना अट एक लाख रुपयांचे कर्ज द्यावे, भाडेकरू रिक्षाचालकांना पंतप्रधान आवास योजनेमधून तात्काळ घरकुले मंजूर करावीत, रिक्षा चालकांचा सुवर्ण जयंती दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये समावेश करावा ,रिक्षा चालकांना घरे दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात शरद सोनुले,मारुती पोवार, विजय बोंर्दे,अलताफ इनामदार, संजय दणाणे,सागर दुगे,बापू चव्हाण यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी ,रिक्षा चालक सहभागी झाले होते.