“गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याची आर्थिक वर्षात २५ लाखांपेक्षा अधिक पोत्यांची विक्रमी विक्री
कोल्हापूर/प्रतिनिधी : अनेक नामांकित खाजगी कंपन्यांना टक्कर देत गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याने सन-२०२०-२०२१ या अर्थिक वर्षात २५ लाख महालक्ष्मी गोल्ड पशुखाद्य पोत्यांची विक्रमी विक्री करत आपल्या गुणवत्तेची व कामाची मोहर दुग्ध व्यवसायात उठवली आहे.
गतसाली कोरोनामुळे जन-जिवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. वर्षभर चाललेल्या या लॉकडाऊनच्या काळातसुद्धा गोकुळ दुध व महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना माञ गतिमान होवून आपल्या दुध उत्पादकांपर्यंत पशुखाद्य पोहोचवायचे कार्य अखंडपणे करत होता.
वेळोवेळी येणा-या अडचणींवर मात करत २५ लाखांपेक्षा जास्त पशुखाद्य पोत्यांची विक्री करत दुध उत्पादकांना दिलासा दिला आहे.
संघाच्या गडमुडशिंगी व कागल एम.आय.डी.सी.या दोन ठिकाणी महालक्ष्मी पशुखाद्य उत्पादित केले जाते, त्याबरोबर जनावरांना त्यांच्या शरीर पोषणा बरोबर दुध वाढीसाठी कारखान्यामध्ये टी.एम.आर. ब्लॉक, फर्टीमिन प्लस, सिल्वर रेशन पॅलेट व लहान वासरांसाठी मिल्क रिप्लेसर, काफ स्टार्टर व फिडींग पॅकेज उत्पादित केले जाते. या सर्व उत्पादनांची गुणवत्ता राखण्यासाठी संघाने ISO बरोबर BIS स्टँडर्डसाठी नोदंणी केली असून, यापुढे चांगल्या गुणवत्तेचे पशुखाद्य गोकुळच्या दुध उत्पादकांना त्यांच्या गाई व म्हैशींसाठी उपलब्ध केले जाईल असे महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याचे व्यवस्थापक डॉ.व्ही.डी.पाटील यांनी सांगितले.
यासर्व यशामागे सर्व दुध उत्पादक, संस्था कर्मचारी, पशुखाद्य व संकलन स्टाफ यांचे श्रेय असून यापुढील काळात अधिक गुणवत्ता व अचुक वितरण व्यवस्था कार्यान्वीत केली जाईल असे गोकुळचे विद्यमान चेअरमन रविंद्र आपटे यांनी सांगितले.